इतिहास आणि विवाद हे समीकरण आता अगदी पाठ झालंय. पिढ्यानुपिढ्या, वर्षानुवर्षे सांगितलेला इतिहास कालौघात बदलला गेला नसेल याची हमी कोण देऊ शकेल. त्यामुळे मी खाली देतोय ते तुम्हाला पटेलच आणि पटायलाच हवं असा काही माझा आग्रह नाही.
Disclaimer : मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता नाही.
- 1950 चा फिफा वर्ल्डकप
असं म्हणतात की, भारत 1950च्या फिफा वर्ल्डकप करिता पात्र असून देखील प्रत्यक्षात वर्ल्डकप मध्ये खेळू शकला नाही कारण भारतीय खेळाडूंकडे शुज नव्हते आणि ते फिफा ने त्यांना विना शुज खेळण्याची परवानगी नाकारली. परंतु फिफाच्या मते, त्यांनी भारताला असा प्रवेश नाकारलाच नाही, हे असत्य AIFF (ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशन) ने पसरवलेलं आहे. काही क्रीडातज्ञांच्या मते, भारतीय संघ खूपच दुबळा होता, व या संघाकडून कसलीही आशा नव्हती आणि शिवाय ब्राझीलला जाण्याचा खर्च देखील जास्त असल्यामुळे, AIFF ने संघाला न पाठवण्याचा निर्णय घेतला
- अमेरिकेचा शोध
सर्वाना माहिती आहे की अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला. परंतु कोलंबस अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचण्यापूर्वी देखील 2 युरोपियन अमेरिकन किनाऱ्यावर पोहचले होते. ते दोन युरोपियन होते - लिफ एरिकसन (कोलंबसच्या 500 वर्ष अगोदर) आणि अमेरिगो वेस्पुसी. यातील अमेरिगो वेस्पुसीच्या नावावरूनच अमेरिका हे नाव आले. लिफ एरिकसन हा कॅनडाच्या किनाऱ्यावर पोहचला होता. खरंतर हे सर्व चालले होते भारताच्या शोधासाठी परंतु कोलंबस हा पहिला व्यक्ती होता, ज्याने ओळखलं की ही नवीन भूमी आहे आणि भारत नाही. त्यामुळे कदाचित कोलंबसला अमेरिकेच्या शोधाचे श्रेय दिले जात असेल.
- भारत 1947 पासूनच धर्मनिरपेक्ष आहे.
खरंतर हे असत्य आपणच तयार केलेलं आहे. कुठल्याही पुस्तकात असं सांगणार नाहीत. भारत धर्मनिरपेक्ष स्वातंत्र्यापासून आहेच पण हे ऑफिसीअली घोषित झालं ते 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने.
- गांधीजींचा नाच
- वरील फोटो पाहिला ? राग आला ? गांधी द्वेष थांबवा. कारण हा फोटो गांधीजींचा नसून ऑस्ट्रेलियन अभिनेत्याचा आहे. आता खाली अजून एक फोटो देतो, त्यामध्ये पाहा.उजव्या बाजूच्या फोटो मध्ये गांधीजींची तब्येत जरा धष्टपुष्ट दाखवली आहे, आणि गांधीजींना चांगले biceps आहेत हे पण दिसतं आहे परंतु डाव्या बाजूला जो खरा गांधीजींचा फोटो आहे त्यामध्ये मात्र तसं काही दिसत नाही.
- नेहरूंनी संयुक्त संघातील स्थायी सुरक्षा पद नाकारले.
सध्या आपल्या कानावर येणार हे एक सर्रास खोटं आहे. खरंतर चीन मध्ये कम्युनिस्ट सत्तेवर आले आणि आशिया खंडात दोन मोठे रशिया आणि चीन हे दोन मोठे देश कम्युनिस्ट असणे अमेरिकेला धोकादायक वाटत होते. त्यात रशियामध्ये स्टॅलिन सत्तेवर असल्यामुळे 1950 - 55 दरम्यान रशियाचा ओढा देखील कम्युनिस्ट चीन कडे जास्त होता. अशावेळी सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाला, आशिया खंडातून चीनच्या उमेदवारी विरुद्ध भारताने उभे राहावे आणि भारताच्या उमेदवारीला अमेरिका पाठिंबा देईल असा प्रस्ताव अमेरिकन राष्ट्रपतींनी खाजगीत नेहरूंना दिला होता. परंतु अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र तसा प्रस्ताव कधीच दिला नाही. तसेच रशिया-चीन संबंधात वितुष्ट आल्यानंतर रशियाने देखील असा प्रस्ताव नेहरूंना 1955 नंतर खाजगीत दिला होता, परंतु तो पर्यंत अमेरिका आणि पाकिस्तान जवळीक तसेच रशिया-चीन वितुष्टामुळे निर्माण झालेली चीन - अमेरिका जवळीक यामुळे असा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला गेला नाही. यामुळे नेहरूंनी भारताचा स्थायी सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारला हे खोटं आहे. हा परंतु नेहरूंनी त्याकरिता प्रयत्न केले नाहीत हे मात्र इतिहास मान्य करतो.Did Nehru Give India’s Permanent Seat At UNSC to China in 1950?
- भगतसिंग यांना तुरुंगात भेटायला काँग्रेस तर्फे कोणीच गेलं नाही.
- हे देखील एक खोट आपण कधीतरी ऐकतो. प्रत्यक्षात भगतसिंग यांना तुरुंगात भेटायला, पंडित नेहरू स्वतः 2 वेळेस गेले
- गांधीजींचा नाच
0 Comments