आदिवासी उपाय योजनेची संकल्पना
आदिवासी बहूल क्षेत्र विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळे टप्पे आखले गेले व त्याखाली राज्य शासनाचे काम चालू असते व हि आदिवासी विकासाची संकल्पना राज्य शासनाच्या धोरणाने चालते ,थोडक्यात महत्वाचे म्हणजे आदिवासी विकास उपाय योजनेसाठी चालू असलेले काम ,निधी आपण आपल्यापर्यंत कसा आणता येईल हे थोडक्यात समजून घेऊ .
bhartiyadiwasi.blogspot.com |
Tribal Sub-plan-TSP आदिवासी उपयोजना;
पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून देशात व महाराष्ट्रात आदिवासी उपयोजना(Tribal Sub-plan-TSP) राबवण्यास सुरुवात झाली. आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रविकासाची संकल्पना भारत सरकारने स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदिवासी क्षेत्राचे पुढीलप्रमाणे विभाजन करण्यात आले आहे.
Intergrated Tribal Development Project(itdp),एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प;
ज्या गावांमध्ये ५० टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल, त्या गावांचा समावेश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत केला जातो, केला जातो. महाराष्ट्रात असे २९ प्रकल्प आहेत.
Modified Area Development Approach(mada),
सुधारित क्षेत्र विकास खंड;
प्रकल्पक्षेत्रालगतच्या प्रदेशात ज्या गावांमध्ये १० हजार लोकवस्ती आहे आणि त्यातील ५० टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल त्या गावांचा समावेश या खंडामध्ये केला आहे. महाराष्ट्रात एकूण ४३ माडा क्षेत्रे आहेत.
0 Comments