१८२२ मध्ये खानदेशात हरिया नावाच्या भिल्ल म्होरक्याने इंग्रजाविरुद्ध रणशिंग फुंकले .असे म्हंटले जाती आणि उल्लेख आढळून येतो कि ह्या उठ्वाची तीव्रता पूर्ण भारतभर पसरली होतो.ह्या उठ्वामुळे ठिकठिकाणी मामलेदाराची फाज्ज्त उडाली घबराटीचे वातावरण तयार झाले .इंग्रज अधिकारी कॅप्टन.रॉबिन्सन ह्याने काही थोड्या प्रमाणात उठावाची कंबर तोडण्यात यश मिळवले .
काल्पनिक चित्र |
ह्या उठवला इंग्रज इतके वैतागले होते कि पुढील दोन वर्षात कंपनी सरकारने भिल्ल्लांच्या बाबतीत सर्पसत्र च सुरु केले .'धर तो मार ,अश्या पद्धतीने कंपनी सरकारने पुष्कळ भिल्लांचे जीव घेतले ,काहीना अति कठोर शिक्षा ठोठवण्यात आल्या .अनेक भिल्ल क्रांतिकारी तुरुंगात डांबले गेले .अनेक भिल्ल स्त्रियांचे कुंकू पुसले गेले ,अनेक लहान मुले अनाथ झाले ,विशेष म्हणजे बलिदान दिलेल्या भिल्लांची नावे तर सोडा पण आकडेवारी देखील उपलब्ध नाही .तरी भिल्ल झुकले नाही, मुळीच नाही.
१८२५ ला भिल्ल उठावाने महत्वाचा टप्पा गाठला .आता ह्या उठवला वेगळे रूप यायला लागले ,ह्याचा फायदा काही राजकारणी लोकांनी वेगळ्या पद्धतीने घेतला गेला .सेवाराम नावाच्या सोनाराने सातारा राजाच्या नावाची बनावट पत्रे तयार करून राजाच्या हुकुमाप्रमाणे वागलान तालुक्यातील भिल्लांना उठावाचे प्रोत्साहन दिले.त्यांना सुद्धा निमित्तच हवे होते .८०० भिल्लांनी उनापुरवर केला आणि मिळेल तो माल ,लुट ,ते मुरली किल्ल्यात घेऊन गेले . पण लगेचच ,ले.औटरमण ने अचानक हल्ला करून त्यातील काही लुट परत मिळवण्यात यश मिळवले .सेवाराम आणि त्याचे काही हस्तक हि कालांतराने पकडले गेले .
काल्पनिक चित्र |
ह्या उठवतील दाहकता बघता कंपनी सरकारने सर्वांनाच शिक्षा सुनावली नाही भिल्ल्लाना शांत करण्याचा प्रयत्न कंपनी करीत होते .काहीना शेती धंद्यात गुंतवले ,शेतमजूर म्हणून कामास लावणे ,तगाई देणे ,जमिनी देणे ह्य सारख्या गोष्टी सुरु केल्या .पण पंड्या,बंदी,सुख सारखे भिल्ल म्होरके धुमाकूळ घालतच होते .भिल्लांना शांत करण्यासाठी ले.औटरमण भिल्लाम्ध्ये उठू ,बसू लागला त्यांच्यात जेवण करू लागला ,राहू लागला थोडक्यात इंग्रजकिती प्रामाणिक आहे हे त्यांना दाखाऊ लागला.हेच तर कारण आहे इंग्रज लेखक माणसाचे गुणगान गातात .
माफीचे जाहीरनामे,त्यात भिल्लांना जमिनी देण्याचे ,तगाई देण्याचे आश्वासन ,माघील गुन्ह्याची माफी आणि त्यांची सैन्यात भरती ह्या गोष्टी भिल्लांना नरम करण्यात कारणीभूत ठरल्या .हळूहळू सामाजिक संस्थात कार्य कण्याकरिता त्यांना उद्युक्त करण्यात येऊ लागले .डोंरातील वाटांचे रक्षण हा त्यांचा पारंपारिक हक्क मान्य करण्यात आला तरी पण १८२६ मध्ये डांगचे प्रमुख आणि लोहारा भिल्ल यांनी उचल खाल्लीच आणि लुटीचा सपाटा चालू केला ,पण त्यांना लवकरच शरण यावे लागले .चौकशी अंती असे आढळून आले कि देशमुख लोकही भिल्लांना ह्या कामात मदत करीत असें .
येथे ले.औटरमण आपल्या बुद्धीचा वापर करीत भिल्ल तुकडीच भिल्ल टोळीला पकडण्यासाठी पाठविली आणि म्हणूनच १८२८ मध्ये ह्या भिल्ल प्रदेशात शांतता निर्माण करण्यात कंपनीला यश आले .इंग्रज रिपोर्ट नुसार २० वर्षातील पहिल्या सहामाहीत भिल्लांनी शांत राहिल्याचे दर्शविण्यात आले .तरी पण पुढील काही वर्षात बंडकरी काही ठिकाणी डोके वर काढतच होते .
संधर्भ -महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे -(इ .स १८१८ ते १८८४)
ले -डॉ.वी.खोबरेकर .
Hariya Uprising; One of the major Uprisings of the Bhil Uprising in Khandesh.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------
मानगढ येथील भिल्ल समुद्याच्या आंदोलनात १५०० भिल्ल आदिवासींचे बलिदान .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 Comments
जय भिल
ReplyDelete