आपल्याला नेहमीच सांगितलं जातं तिसरं महायुद्ध होईल ते पाण्यावरून होईल पण ती एक धूळफेक आहे.
जगात तिसरं महायुद्ध होण्याच सर्वात मोठं कारण असू शकत धर्म आणि इस्राईल किंवा पाकिस्तान त्याला कारणीभूत ठरू शकतो.
इस्राईल हा चारी बाजुंनी मुस्लिम देशांनी वेढलेला देश आहे. जगभरातील मुस्लिम व मुस्लिम देश इस्राईल चा पराकोटीचा द्वेष करतात.
आपल्याला नेहमीच सांगितलं जातं तिसरं महायुद्ध होईल ते पाण्यावरून होईल पण ती एक धूळफेक आहे.
जगात तिसरं महायुद्ध होण्याच सर्वात मोठं कारण असू शकत धर्म आणि इस्राईल किंवा पाकिस्तान त्याला कारणीभूत ठरू शकतो.
इस्राईल हा चारी बाजुंनी मुस्लिम देशांनी वेढलेला देश आहे. जगभरातील मुस्लिम व मुस्लिम देश इस्राईल चा पराकोटीचा द्वेष करतात.
१० मे पासून इस्राइल आणि पॅलेस्टाइन या दोन देशांमधे जोरदार संघर्ष चालू झाला होता . या दोन देशांमधे नेहमीच चकमकी होत असतात व यामुळे आजपर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन देशांमधील संघर्षाचा इतिहास १९४८ पासून सांगीतला जात असला तरी हा संघर्ष हजारो वर्षांपूर्वीचा आहे.
इस्राइल हा ज्यू धर्मियांचा जगातील एकमेव देश तर पॅलेस्टाइन हा मुस्लिमांचा देश आहे. हि लढाई खर दोन देशातील नसून दोन धर्मातील आहे. ज्यू, इसाई व मुस्लीम या तीनही धर्माचा मूळ स्त्रोत हा एकच आहे म्हणून या तीनही धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणल जात. हे तीनही धर्म एकमकांच्या एवढे जवळचे असले तरी या धर्मामध्ये नेहमीच संघर्ष होत आलेला आहे.
इस्राइल व पॅलेस्टाइन या दोन देशांमधे संघर्षाच प्रमुख कारण आहे ते म्हणजे जरुसेलम शहर. या जरुसेलम शहरामध्ये ३५ एकर मधे पसरलेले एक प्रार्थना स्थळ आहे व या प्रार्थना स्थळाच्या ताब्यावरून या दोन देशांमधे नेहमी संघर्ष होत असतो.
ज्यू धर्म हा या तीनही धर्मामधील सर्वात जुना धर्म आहे. जेरुसेलम व सध्याच्या इजराइल च्या परिसरामध्ये ज्यू लोक ३००० वर्षापासून राहत आहेत. इसवीसन पूर्व ९५७ च्या दरम्यान इस्राइल चा राजा सोलोमन याने जेरुसलेम मधे ज्यू धर्मियांच सर्वात पवित्र मंदिर बांधल. नंतर जेरुसलेम या शहरावरती बेबिलोनिया साम्राज्याच राज्य आल व त्यांनी हे मंदिर उद्वस्त केले.
काही वर्षांनी ज्यू धर्मियांनी या जागेवारती पुन्हा एक मंदिर बांधल पण त्यानंतर जेरुसलेम शहर रोमन साम्राज्याचा राजवटीत आल व पुन्हा ते उध्वस्त केल गेल. सध्या या मंदिराची फक्त एक भिंत शिल्लक आहे व या भिंतीचीच पूजा हे ज्यू लोक करत असतात. या मंदिरालाच टेम्पल माउंट म्हणतात. जगातील सर्व ज्यू लोक आजही जेरुसलेम च्या दिशेला तोंड करून प्रार्थना करतात इतक हे शहर ज्यू लोकांसाठी पवित्र आहे व या शहराचा ताबा मिळावा यासाठी हे ज्यू लोक नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत.
त्यानंतर इसवी सन कालखंड सुरु झाल्यावर व मुस्लीम धर्माचा उदय झाल्यांनतर जेरुसलेम शहराचा ताबा मुस्लीम धर्मियांनी घेतला. मुस्लीम धर्मियांच्या मते या ३५ एकर च्या जागेवरून पैगंबर मोहम्मद यांनी स्वर्गात प्रवास केला. यामुळे हि जागा मुस्लीम धर्मा साठी मक्का- मदिना नंतर सर्वात पवित्र आहे.
हि जागा दोनही धर्मा साठी एवढी पवित्र असल्याने या दोनही धर्मामध्ये या जागेचा ताबा घेण्यावरून नेहमीच संघर्ष होत असतो व सध्याही होत आहे. जेरुसलेम च्या या भागावर जवळपास १३०० वर्ष मुस्लीम साम्राज्याची सत्ता राहिली.
अगोदर रोमन साम्राज्य व त्यानंतर मुस्लीम साम्राज्य या जेरुसलेम व आसपास च्या भागामध्ये राज्य करत असल्याने ज्यू धर्मीय मात्र याभागातून विस्थापित झाले. विशेषकरून हे ज्यू लोक युरोप मधे स्थाईक झाले. पण युरोप मधे सुद्धा ज्यू लोकांचा त्रास कमी झाला नाही. इसाई धर्मियांना नेहमीच वाटत आलेले आहे कि येशू यांची हत्या हि ज्यू लोकांनी केली त्यामुळे ज्यूंवर युरोप मधे खूप अत्याचार होत राहिले.
आपल्यावर होत असलेला अन्याय यामुळे स्वतःचा देश असावं हि भावना ज्यू लोकांच्या मनामध्ये तयार होऊ लागली. या विचारला झायोनीझम अस म्हणल जात. ज्यू धर्मियांचा देश हा जेरुसलेम च्या आसपास असावा अस ज्यूंच्या धर्मग्रंथात लिहलेले आहे म्हणून जगभरातील ज्यू लोक या भागात पुन्हा राहायला येऊ लागले.
पहिल्या महायुद्धातील विजयानंतर सध्याचा इस्राइल देशाचा भाग ब्रिटीशांच्या ताब्यात होता. ब्रिटीशांनी या भागात ज्यू लोकांना त्यांचा स्वतःचा देश निर्माण करण्याच आश्वासन दिल त्याबदल्यात ज्यू लोकांनी ब्रिटीशांची युद्धात साथ द्यायची अस ठरल.
दुसरीकडे जर्मनी मधे हिटलर सत्तेत आला होता व त्याने ज्यू लोकांवर अत्यचार करायला सुरवात केली. हिटलर ने साठ लाखांच्या आसपास ज्यू लोकांना ठार मारल त्यामुळे युरोपातील ज्यू लोक सध्याच्या इस्राइल भागात विस्थापित होऊ लागले.
ज्यू लोकांच मोठ विस्थापन या भागात झाल्याने आसपास च्या अरब देशांनी या विस्थापनास विरोध केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही व मोठ्या प्रमाणात ज्यू लोक सध्याच्या इस्राइल च्या भागात येऊ लागले. ज्यू धर्मियांचा विस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला व शेवटी हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांमध्ये गेला. सयुंक्त राष्ट्रांनी या भागात दोन देश धर्माच्या आधारवर तयार करण्याचा निर्णय घेतला.
ज्यू लोकांचा इस्राइल व मुस्लीम धर्मियांचा पॅलेस्टाइन व जेरुसलेम वर आंतरराष्ट्रीय ताबा राहील अस सयुंक्त राष्ट्रांनी ठरवलं. हा निर्णय ज्यू लोकांनी मान्य केला कारण त्यांना स्वतः चा देश तयार करायचा होता मात्र पॅलेस्टाइन व शेजारील अरब राष्ट्रांना हा निर्णय मान्य नव्हता.
१९४८ साली इस्राइल देशाची निर्मिती झाली व इस्राइल मधील अरब मुस्लिमांना दुसरीकडे विस्थापित व्हाव लागल. याचा राग धरून इस्राइल च्या शेजारील देश इजिप्त,जोर्डन,सिरीया व इराक यांनी पॅलेस्टाइन च्या मदतीने इस्राइल वर हल्ला केला. एकत्र एवढ्या देशांनी हल्ला करुनही इस्राइल चा भूभाग या देशांना काबीज करता आला नाही पण पॅलेस्टाइन चा पश्चिम भाग जोर्डेन ने तर तर गाझा पट्टीचा भाग इजिप्तने काबीज केला.
पुढे अशा खूप लढाया झाल्या पण जवळपास प्रत्येक लढाईत इस्राइल विजयी होत गेले व इस्राइल देशाची सीमा वाढत गेली. सध्या जेरुसलेम शहर सुद्धा इस्राइल च्या ताब्यात असल्यासारखं आहे. मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र धर्मस्थळ इस्राइल ने आपल्या ताब्यात घेतल आहे म्हणून पूर्ण जगातील मुस्लीम देश इस्राइल चे शत्रू बनलेले आहेत.
सध्या हा विवाद पुन्हा उफाळून येण्याच कारण आहे ते म्हणजे शेख जर्रा. पूर्व जेरुसलेम मध्ये शेख जर्रा नावाची वसाहत आहे. इस्राइल पॅलेस्टाइन युद्धात विस्थापित झालेल्या पॅलेस्टाइनी लोकांना जोर्डेन ने या भागात राहायची सोय केली होती. सध्या हा भाग सुद्धा इस्राइल च्या ताब्यात आहे व या शेख जर्रा मधील १३ पॅलेस्टाइनी परिवार व इस्राइल यांच्यामध्ये जमिनीचा वाद चालू आहे. हे १३ परिवार राहतात त्या जागेवर इस्राइल ने आपला मालकी हक्क सांगीतला आहे व हि केस सुप्रीम कोर्टात चालू आहे.
या केस चा निकाल १० मे ला लागणार होता, शिवाय १० मे हा दिवस ज्यू लोक जेरुसलेम दिवस म्हणून साजरा करतात.या जेरुसलेम दिवशी ज्यू लोक मोठ मोठ्या मिरवणुका काढतात. पॅलेस्टाइन च्या लोकांना अस वाटल कि कोर्टाचा निकाल हा आपल्या विरोधातच लागणर आहे कारण हि केस इस्राइल च्या सुप्रीम कोर्टात चालू आहे व निकालाच्या दिवशी जेरुसलेम दिवस पण आहे म्हणून काहीतरी मोठी घडामोड होऊ शकते.
या दिवशी इस्राइल चे लोक अल अक़्सा मशीदीवर ताबा मिळवतील अशा भीतीने पॅलेस्टाइनचे हजारो लोक या मशिदीमध्ये गोळा झाले. या लोकांमध्ये व तिथ बंदोबस्ताला असणाऱ्या इस्राइल पोलिसांमध्ये संघर्ष झाला व पोलीस या लोकांना पकडण्यासाठी मस्जीदी मधे घुसले. यामुळेच गाझा पट्टीतील कट्टरवादी संघटना हमास ने चिडून इस्राइल वर शेकडो हवाई हल्ले केले.
याला उत्तर म्हणून इस्राइल ने सुद्धा गाझा पट्टीवर एअर स्ट्राईक सुरु केले व असे हल्ले अजूनही चालू आहेत. यामुळे जगातील सर्व मुस्लीम देश इस्राइल विरुद्ध एकवटले आहेत. इस्राइल च्या बाजूने सध्या फक्त अमेरिका उघडपणे उभा दिसतोय. हा संघर्ष अजून काही दिवस असाच चालू राहिला तर जग दोन गटात विभागल्या शिवाय राहनार नाही एवढ मात्र नक्की.
israel palestine conflict | इजराइल पॅलेस्टाइन संघर्ष का होतो - हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा.
0 Comments