भारतामध्ये हत्तीच्या पायाखाली देणे, तोफेच्या तोंडी देणे, भिंतीत जिवंत चिणने अशा बऱ्याच मृत्यूदंड च्या शिक्षा होत्या परंतु आपण प्राचीन युरोपियन लोकांपेक्षा थोडे जास्त सुसंस्कृत असल्यामुळे वरील शिक्षा सौम्य वाटाव्यात एवढ्या भयंकर मृत्यू देण्याचे प्रकार त्यांनी शोधून काढले होते त्यातील काही खाली देत आहे.
लोकांना मारण्यासाठी उंदीर वापरणे:
एक बादलीत उंदीर ठेवून ती बदली उपडी गुन्हेगाराच्या पोटावर ठेवायची आणि मागून आग लावून द्यायची .आग जशी वाढेल तसा उंदीर बाहेर जायचा प्रयत्न करीत आणि त्याला बाहेर जायला एकच मार्ग असेल जो त्या व्यक्तीच्या पोटातून असे. मग उंदीर त्या व्यक्तीचे पोट आनि आतडे कुरतडून बाहेर पडायला पाही आणि अशाच अवस्थेत त्या माणसाचा मृत्यू होई.
सिसिलिअन बुल:
प्राचीन ग्रीस मध्ये लोक बैलाच्या आकाराचा ब्रॉंझ चा बैल बनवत आणि आतल्या पोकळीत त्या माणसाला बसवत ज्याला शिक्षा द्यायची आहे .खालून आग लाऊन आतील माणसाला जिवंत शिजवायचे त्याच्या किंकाळ्या बैलाच्या उघड्या तोंडातून शा आवाजात बाहेर ऐकू येत की जणू बैलच ओरडत आहे.
यातनादायी चक्र:
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक फिरत्या आणि फिरेल तसे घट्ट होत जाण्याऱ्या चाकावर मनुष्याला बांधत आणि सावकाश चाक फिरवत. जसे चाक आवळत जाईल तसे बांधलेल्या माणसाला सुद्धा स्वतःची हाडे मोडल्याचा आवाज ऐकू येत असे .शेवटी अतिशय वाईट प्रकारचा मृत्य येई.
इमपलेमेन्ट:
खालील चित्र पाहिल्यावर आणखी काय सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, फक्त ही पद्धत हळू हळू होत असे ज्यामुळे आतडी आणि बाकीचे अवयव फाटल्याची जाणीव गुन्हेगारला होत असे.
उलटा लटकावून कापणे:
ह्या पद्धतीमध्ये गुन्हेगाराला उलटा लटकावून करवतीने सावकाश सावकाश कापत.
हात पाय उखडणे:
एका टेबलावर माणसाला हात पाय बांधून झोपवत व त्याच्या हातापायांच्या दोऱ्या एक फिरत्या स्क्रू ला जोडत. स्क्रू फिरवल्यावर हात आनि पाय ताणले जात. हात आणि पाय उखडून निघेपर्यंत ही प्रोसेस चालत असे.
0 Comments