खानदेश ला 'खानदेश , म्हणण्याचे कारण !

Header Ads Widget

खानदेश ला 'खानदेश , म्हणण्याचे कारण !

           खानदेश ला 'खानदेश , म्हणण्याचे कारण ;-

इतिहास                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचा समावेश असलेल्या खान्देश या नावाचा इतिहास काही प्रमाणात मनोरंजक आहे. प्राचीन काळी आसिक व ऋषीक नावाने प्रसिद्ध असलेल्या खान्देशाचे नामकरण सेउणदेश...कन्हदेश...दानदेश असे झाले. खान्देशच्या भौगोलिक स्थानामुळे या प्रदेशास विलक्षण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.रामायण व महाभारतामध्ये खान्देशचा आसिक व ऋषीकांचा प्रदेश असा नामोल्लेख केला आहे. वनवासात असताना सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाने वानरांना विदर्भ, ऋषीक व माहिषक या प्रदेशात जाण्यास सांगितले होते. महाभारतात एकदा ऋषीकांचा उल्लेख विदर्भ व पश्चिम अनुप या देशांबरोबर तर कर्णाने जिंकलेल्या प्रदेशात अश्मकासहित केला आहे.यादव राजा सेउणचंद्राच्या नावावरून सेउनदेश नामकरणयादव काळात ज्याला सेउणदेश म्हणत होते त्यात खान्देशचा समावेश होता. यादव राजा सेउणचंद्र पहिला यांच्या नावावरून सेउनदेश असे नाव पडले. या प्रदेशात प्राचीन काळी ऋषीक नावाचे हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण असल्याचा समज आहे. त्यावरून कृष्ण-कान्हा- कन्ह असा बदल होऊन कन्हदेश असे नाव पडले असण्याची शक्यता आहे.खान्देश हे नाव फारूखीपूर्व काळातीलइतिहासकार फरिश्ता याने १२९६ मध्ये मुस्लिमांनी जिंकलेल्या खान्देशच्या अधिपतीवर असा उल्लेख करतो, त्या अर्थी खान्देश हे नाव फारूखीपूर्व काळातील असावे असा संदर्भ येतो. मात्र कर्नल साईक्स हा खान्देश नावाची व्युत्पत्ती खंड किंवा खिंड या शब्दावरून झाल्याचे मानतो. फिरोजशहा तुघलकाने खान्देशची जहागिरी मलिक राजा फारूकीकडे १३७० मध्ये सोपविली. दुसरा फारूकी सुलतान नसीर खान फारूकी या काळी म्हणजे इ.स.१३९९ ते १४३७ दरम्यान या प्रदेशाला खान्देश नाव प्राप्त झाले असावे असे अब्दुल फजल नमूद करतो.

                   दानियालच्या सन्मानार्थ खान्देशचे नामकरण दानदेशकालांतराने अकबराने फारूकी राजवटीचा अंत करून हा प्रदेश जानेवारी १६०१ मध्ये जिंकून घेतला. राजपुत्र दानियाल याच्या सन्मानार्थ खानदेशचे ‘दानदेश’ असे नामांतर करून घेतले. ऐन-इ-अकबरी मध्ये दानदेश हेच नाव वापरले आहे. पुढे दानदेश हे नाव मागे पडून अधिकृत ग्रंथांमध्ये खान्देश हेच नाव प्रचलित झाले.दानदेशाची सिमा लळींगपर्यंतअबुल फझलने पाहिलेल्या अकबरकालिन दानदेशाची लांबी बोरगावपासून निजामशाहीच्या सीमेवरील लळींगपर्यंत म्हणजे ७५ कोस होती. दानदेशाची रुंदी माळव्याच्या सीमेनजीकच्या पाल गावापासून वºहाडच्या सीमेजवळ असलेल्या जामोद गावापर्यंत ५० कोसापर्यंत होती. दानदेशाच्या पूर्वेस वºहाड, उत्तरेस माळवा, दक्षिणेस गालना (जालना) आणि पश्चिमेस माळवा डोंगररांगापैकी दक्षिण रांग असल्याचा संदर्भ आढळून येतो. समकालिन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांपैकी तापी नदीचा समावेश केला आहे.१६३४ मध्ये माळव्यातील नंदुरबारचा समावेशअकबराच्या साम्राज्यात असलेल्या खान्देश सुभ्यात सरकार हे प्रशासकीय घटक नव्हते. सुभ्याची ३२ परगण्यांमध्ये विभागणी करण्यात आलेली होती. इ.स.१६३४ मध्ये माळव्यातील नंदुरबार सरकारचा खान्देश सुभ्यात समावेश करण्यात आला.तोपर्यंत नंदुरबार ‘सरकार’ खान्देशात नव्हते. अकबराने असिरगड जिंकल्यावर या प्रदेशातील महसुलात ५० टक्के वाढ केली होती.समृद्ध आणि भौगोलिक स्थानामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेला खानदेशदख्खनच्या पठाराच्या उत्तर भागावरील या प्रदेशातून अतिप्राचीन काळापासून उत्तर हिंदुस्थानातून दक्षिणेकडे जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग होता. सातवाहन काळापासून उत्तर-दक्षिण जाणारा मार्ग प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि पुढे तेर पर्यंत असून सेउणदेशातून होता. मध्ययुगीन काळातील समकालिन ऐतिहासिक ग्रंथांमधून स्पष्ट दिसते की, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याच्या मुख्य मार्गात नर्मदा नदीला हंडिआ नजीक उतार होता. हंडिआचा उतार पार केल्यावर असीरगड आणि बºहाणपूर या दरम्यान सातपुड्यातील भागातून हा मार्ग दक्षिणेत आलेला होता. त्यावरूनच सेनादल व व्यापारी मालाची वाहतूक होत होती. खलजी व तुघलक यांचे सेनादल याच मार्गाने दक्षिणेत आल्याचे संदर्भ आढळून येतात.

भारतातील बाॅम्बे प्रेसिडेन्सीचा भाग

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/khandesh.html
नंतर ब्रिटिश सरकारने १९०६ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे बनवले. उर्वरित भागाचा नाशिक जिल्ह्यात समावेश आहे. १९६० मध्ये बाॅम्बे प्रेसिडेन्सीचे महाराष्ट्र व गुजरात राज्यात विभाजन झाले. खानदेश हा भाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. १९६०-६५ मध्ये खानदेश नाव असलेल्या जिल्ह्यांचे नामकरण धुळे जिल्हा व जळगांव जिल्हा करण्यात आले. १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. हा सर्व परिसर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्रातील खानदेश परीसर
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/khandesh.html
्प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे विभाग तयार केले गेले. त्यात उत्तर महाराष्ट्र हा एक विभाग आहे.
उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/khandesh.html

या विभागात वर्तमान धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागाचा खानदेश समावेश होत नाही.

म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रस खानदेश नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागास खानदेश म्हणतात. आता या प्रदेशाचे अधिकृत नाव हे खानदेश नाही तर उत्तर महाराष्ट्र व नाशिक विभाग असे आहे.

( सर्व फोटो गुगल वरुन घेतले)






Post a Comment

0 Comments