Many times in the film you have seen soldiers talking to Alpha, Bravo, Charlie; What exactly does this code word mean?

Header Ads Widget

Many times in the film you have seen soldiers talking to Alpha, Bravo, Charlie; What exactly does this code word mean?

     चित्रपटात अनेक वेळा आपण सैनिकांना अल्फा,ब्राव्हो, चार्ली बोलताना बघितले आहे; या सांकेतिक शब्दाचां नेमका अर्थ काय होतो.

आपण चित्रपटामध्ये बऱ्याचदा सैनिकांच्या तोंडून Alpha / Alfa, Bravo, Charlie, Delta असे शब्द ऐकत असतो. परंतु हे सांकेतिक शब्द म्हणजे जागतिक स्तरावर सर्व देशाच्या सैन्यांमध्ये वापरण्यात येणारा तसेच NATO (North Atlantic Treaty Organization) ने मान्यता दिलेला एक अक्षरांचा समूह म्हणजेच सांकेतिक शब्द आहेत. (काही देश हे सांकेतिक शब्द वापरत नसतीलही, पण माझ्या माहितीप्रमाणे याच सांकेतिक शब्दांचा जास्त वापर होतो.) तर आधी आपण संपूर्ण शब्द समूह पाहुयात आणि मग हेच शब्द का या मागचं कारण ….
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/many-times-in-film-you-have-seen.html

Military Letters = Code Word

A = Alfa / Alpha
B = Bravo
C = Charlie
D = Delta
E = Echo
F = Foxtrot
G = Golf
H = Hotel
I = India
J = Juliet
K = Kilo
L = Lima
M = Mike
N = November
O = Oscar
P = Papa
Q = Quebec
R = Romeo
S = Sierra
T = Tango
U = Uniform
V = Victor
W = Whiskey
X = Xray
Y = Yankee
Z = Zulu

आता केवळ अक्षरेच नाही, तर अंकांना सुद्धा सांकेतिक शब्द आहेत.

1 WUN
2 TOO
3 TREE
4 FOWER
5 FIFE
6 SIX
7 SEVEN
8 AIT
9 NINER
0 ZERO

आता जेव्हा दोन व्यक्तीमध्ये रेडिओ द्वारे संवाद होत असतो, तेव्हा ते एकमेकांपासून खूप लांब, अडचणीच्या ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा वेळी बऱ्याचदा सिग्नलच्या, तांत्रिक अडचणी मुळे समोरच्या व्यक्तीला आपलं संभाषण व्यवस्थित ऐकू जाण्याची शक्यता कमी असते. म्हणजेच कमी आवाज, अस्पष्ट शब्द ऐकू जाण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळी काही महत्वाच्या गोष्टी, ठिकाणांची माहिती किंवा महत्वाचा मजकूर अधोरेखित करून सांगण्यासाठी वरील सांकेतिक शब्द आणि अंकांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ : समजा एखादा सैनिक एखाद्या ठिकाणाचं स्थान सांगत असेल, आणि त्याने सांगितलं कि, DM1098, तर अशा वेळी पहिली दोन अक्षर CM, TM, PM, PN, CN अशी चुकीची अथवा सामान उच्चार असणाऱ्या शब्द ऐकू जाण्याची / ऐकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गोंधळ किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मग असा गोंधळ किंवा गैरसमज टाळण्यासाठी Delta-Mike-WUN-ZERO-NINER-AIT अशा प्रकारे ते स्थान / ठिकाण किंवा तो मजकूर सांगितला जातो. जेणेकरून कमी किंवा अस्पष्ट आवाजातही त्याची व्यवस्थित नोंद घेतली जाऊ शकेल. म्हणजेच मजकूर ऐकण्यात चूक होण्याची संभाव्यता अत्यंत कमी होते.

आता काही सांकेतिक शब्दांचा एकत्रित उच्चार केल्यास त्याचा काही एक अर्थ सुद्धा मिळतो.

Bravo Zulu: Good job.
Charlie Mike: Continue Mission
Echo Tango Sierra: Expiration Term of Service (someone who is about to complete their tour of duty)
Mikes: Minutes
November Golf: NG or No Go (fail)
Lima Charlie: Loud and Clear
Oscar-Mike: On the Move
Tango Mike: Thanks Much
Tango Uniform
: Toes Up, meaning killed or destroyed
Tango Yankee: Thank You

आता एवढं सगळं शोधल्यावर मी आपल्याकडील Tango Charlie या हिंदी चित्रपटाच्या नावाच्या या दोन शब्दांचा पण अर्थ शोधण्याचा खूप प्रयन्त केला. परंतु या शब्दांचा वरील प्रमाणे वेगळा असा काही अर्थ मिळाला नाही. बहुतेक प्रत्येक आर्मी मध्ये या सांकेतिक शब्दांचा वापर करून काही वेगळे सांकेतिक अर्थ तयार केले गेले असावेत. हे माझं मत आहे

Post a Comment

0 Comments