Who is the most brutal dictator in the world?जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा कोण?

Header Ads Widget

Who is the most brutal dictator in the world?जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा कोण?

 जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा कोण?

क्रूर हुकूमशहा म्हटल का आपला प्रवास हिटलर पासून सुरू होऊन मुसोलिनी वर येऊन थांबतो...पण एक असाही होता. ज्याने हिटलर पेक्षा अधिक अत्याचार आणि लोकांचे जीव घेतलेत तरीही आपल्याला त्याच नाव देखील माहीत नाही...

हिटलरने 60 लाख लोकांचा जीव घेतला अस म्हटलं जातं तर या क्रूर राजाने आपल्या 23 वर्षाच्या काळात 1 कोटी ते 1.2 कोटी लोकांचे जीव घेतल्याचं म्हटल जात.अन्याय,अत्याचाराच्या सगळ्या सीमा याने पार केल्या आहेत…

त्याच नाव म्हणजे किंग लिओपोल्ड 2…

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/who-is-most-brutal-dictator-in-world.html
लिओपोल्ड हा 1865 ते 1908 पर्यंत बेल्जियम चा राजा राहिला

आफ्रिका खंड नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असा आहे.ती संसाधनेच तेथील लोकांसाठी सगळ्यात मोठा श्राप ठरली आहेत.या संसाधनांच्या हव्यासापोटी अनेकांनी आक्रमण केली. तेथील लोकांनाच गुलामगिरीत ढकलल.सर्वप्रथम ब्रिटिशांनी व्यापारी दृष्टिकोनातून उत्तम असणारे सागरीतट असणारे प्रदेश ताब्यात घेतले.त्यानंतर अनेक युरोपीय देशांनी देखील प्रदेश ताब्यात घेतले...

मात्र काँगो प्रदेशावर कोणत्याच देशाने जास्त लक्ष्य दिलं नाही कारण हा प्रदेश सागरी तटापासून दूर होता आणि मोठ्या प्रमाणात जंगलांनी वेढलेला होता.पण रबर आणि सोन्याची इथे मोठ्या प्रमाणात उपलब्धता होती.

काँगो प्रदेश...

हीच गोष्ट बेल्जियमच्या लिओपोल्ड ने हेरली आणि त्याने काँगो मध्ये पाय रोवण्याचा निर्धार केला.

पण बेल्जियम सरकारचा गुलामगिरी आणि कोणत्याही देशाने काँगो प्रदेशात वसाहत स्थापन करण्यास विरोध होता. सरकारने आपल्याला विरोध करू नये म्हणून लिओपोल्डने त्यांना आश्वासन दिले की मी तिथे जाऊन गरीब लोकांची काळजी घेईन. त्यांची योग्य ती सोय करून त्यांच्या योग्य त्या गरजा पूर्ण करेन... त्यासाठी बेल्जियम सरकार ने पाठिंबाही दिला आणि पैसाही....

जगाला दाखवण्यासाठी त्याने इंटरनॅशन आफ्रिकन सोसायटी ची स्थापना केली.

लिओपोल्ड ने सुरुवातीला 3000 हजार च्या आसपास बेल्जियम मधील नागरिकांना काँगोत पाठवलं. पाठवताना लिओपोल्ड ने आदेश दिला होता.तेथील लोकांना मारून क्रॉस वर लटकवा.त्यांच्या बायकांबरोबर संबंध प्रस्थापित करा, त्यांना आणि त्यांच्या मुलांना देखील मारून क्रॉस वर लटकवा.
मिशीनरी देखील त्यांच्यासोबत होते.त्यांचं काम अत्याचार करून ख्रिचन धर्मात परिवर्तन करणे…

लिओपोल्ड च्या लोकांना माहीत होत इथ नैसर्गिक रबरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. पण ते रबर मिळवायचे कसं हे त्यांना माहीत नव्हतं म्हणून त्यांनी तेथील स्थानिक जमाती होत्या त्यांना संपर्क केला.आणि त्यांच्या कडून रबर मिळवण्यास सुरुवात केली. त्याबरोबर बळजबरीने सोन उत्खनन करण्यास , हत्तींना मारून हस्तिदंत मिळवण्यास सुरुवात केली.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/who-is-most-brutal-dictator-in-world.html
काही स्थानिक जमातीने त्याला पुरेपूर विरोध केला पण लिओपोल्ड ने त्यांच्यातच भांडणे लावत गुलामगिरी चालू केली.(गुलामगिरी वर बंदी असतानाही..) विरोध करणाऱ्यांना जिवंत जाळले...उपाशी ठेऊन भुकेने तडफडून जीव घेतला...

पुढे जाऊन काँगो प्रदेश पूर्ण माझ्या ताब्यात आहे अस घोषित केलं. काँगो आणि काँगोतील लोक लिओपोल्ड ची खाजगी मालमत्ता झाली.येवढ्या मोठ्या प्रदेशावर लक्ष्य आणि वचक ठेवण्यासाठी लिओपोल्ड ने एक सेना स्थापन केली.यात अनेक काँगो लोक आणि बेल्जियम चे लोक होते.

बेल्जियम सरकारचा विरोध होऊ नये म्हणून मी लोकांना काम देऊन त्यांच्या गरजा भागवतो आहे अस भासवत सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली.बेल्जियम सरकारला देखील पैसे देण्याचं मंजूर केलं.

स्थापन केलेली सेना बळजबरीने स्थानिक लोकांना गुलाम बनवू लागले.त्यांच्यावर अत्याचार करू लागले. काँगोतील लोकांनाच त्या लोकांवर अत्याचार करण्यास भाग पाडलं.
अत्याचार करताना ते हात पाय तोडायचे, काटेरी चाबकाने मारायचे. जिवे मारत नसत कारण जास्त प्रमाणात लोक मारल्यास त्यांच्यासाठी काम कोण करणार...

त्या सेनेचा जो प्रमुख होता तो तुटलेले हात, पाय, डोक घरात सजावट म्हणून वापरत होता...त्याच पूर्ण घर तुटलेल्या अवयवांनी सजलं होतं...

तुटलेल्या हातांचे आणि पायांचे नुसते ढेर जमा होत होते.लहान मूल,स्त्रिया,वृद्ध कुणालाही सोडत नव्हते…

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/who-is-most-brutal-dictator-in-world.html
हात गमावून बसलेले हताश दोघे जण…




https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/who-is-most-brutal-dictator-in-world.html
गुलामगिरीत असलेल्या लोकांच्या खांद्यावर विश्राम करताना लिओपोल्ड चे सैन्य…
खाली दिसत असलेला फोटो एलिस सिली यांनी घेतला आहे.एक बाप आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या तुटलेल्या हातांकडे बघत आहे.चुमुकलीच नाव बोरा होत.मजूर असलेल्या वडलांनी दिवसाला अपेक्षित रबर जमा नाहीं केले म्हणून बोरा चे हात तोडण्यात आले.तिला नरभक्षक लोकांच्या हाती देण्यात आल तिचे लचके तोडण्यात आले.येवढं करूनही मजुराची शिक्षा म्हणून बायकोलाही मारून टाकण्यात आल आणि नरभक्षकांच्या हवाली केलं...येवढं सगळं फक्त दिवसाला अपेक्षित रबर न दिल्यामुळे..

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/who-is-most-brutal-dictator-in-world.html

1900 नंतर बेल्जियम सरकारला आणि उर्वरित जगाला याची भणक लागू लागली आणि विरोध होऊ लागला.1908 मध्ये लिओपोल्ड चा मृत्यू झाला.1909 पर्यंत काँगो मधील अत्याचार बंद झाले.

परंतु लिओपोल्ड च्या लालसेने अर्धी काँगोची लोकसंख्या मृत्यू पावली जी 1.2 कोटी च्या आसपास होती.

आश्चर्याची गोष्ट अशी की अजूनही बेल्जियम मध्ये लिओपोल्डचे हजारो पुतळे आहेत आणि त्याला मानणारे लोक आहेत....

येवढं असूनही अनेकांना याबद्दल माहित नाही किंवा जास्त लक्ष्य देत नाही त्याच कारण म्हणजे आपल्याला आणि उर्वरित जगाला आफ्रिकेतील लोकांबद्दल कधीही आपुलकी वाटली नाही.त्यांच्याप्रती जगाची संवेदना कधी जागृत झालीच नाही…

अजूनही काळ्या लोकांबद्दल अनेकांमध्ये घृणा आहे.त्याचाच परिणाम म्हणून ब्लॅक लाईव्ह मॅटर चालू झालेली चळवळ... जगाचं लक्ष्य फक्त तेथील संसाधनावरच होत…आणि आहे…

फोटो  स्त्रोत;- गूगल,मोबाईल गॅलरी

इतर स्त्रोत;-गूगल

राणा पूंजा भील .

चंगेझ खान ,Changez Khan history in Marathi.



Post a Comment

0 Comments