(इमेज: डी डब्ल्यू) |
अफगाणिस्तानात आपले वर्चस्व प्रस्थापित करताच असंख्य तालिबानी आणि त्यांचे समर्थक मशीन गन, बंदुका आणि 'पांढरे तालिबानी ध्वज' घेऊन काबूलच्या रस्त्यावर उतरले. तर तालिबानी झेंड्याचा रंग 'पांढरा' असून त्यावर इस्लामिक शहादा (Shahadah) काळ्या रंगात छापलेली आहे.
त्याचवेळी इसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेने वापरलेल्या ध्वजाची पार्श्वभूमी पूर्णपणे विरुद्ध आहे, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. इसिसचा ध्वज काळ्या रंगाचा असून त्यावर इस्लामिक शहादा मात्र पांढऱ्या रंगात छापलेली आहे.
दोन्ही दहशतवादी संघटनांच्या ध्वजांमध्ये परस्परविरोधी रंग आहेत. कदाचित ते वेगळे दिसण्यासाठी असावेत.
तालिबान आणि इसिस हे दोन्ही कट्टर दहशतवादी गट स्वतःला इस्लामिक धर्माचे सर्वात मोठे संरक्षक आणि अनुयायी मानतात. ते त्यांच्या कार्याला अल्लाहच्या दृष्टीने सर्वोच्च मानतात. दोन्ही गटांचा असा आग्रह आहे की त्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर 'इस्लाम' प्रस्थापित करण्यासाठी ते 'इस्लामिक जिहाद' करत आहेत.
(इमेज: ऑप इंडिया |
तालिबान इसिसपेक्षा खूप जुनी संघटना आहे. सुरुवातीला अफगाणिस्तानच्या गृहयुद्धात आक्रमण करणाऱ्या सोव्हिएत सैन्याशी सामना करताना त्यांनी पांढरा ध्वज वापरला होता. 1996 मध्ये तालिबानने काबूल काबीज केले आणि अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात स्थापन केले. तेव्हा पांढरा ध्वज त्या देशाचा 'राष्ट्रीय ध्वज' बनला. हा राष्ट्रध्वज त्यांचा विश्वास आणि सरकारच्या पवित्रतेचे प्रतिनिधित्व करतो. नंतर 1997 मध्ये तालिबान्यांनी त्यांच्या ध्वजामध्ये इस्लामिक 'शहादा' जोडला.
शहादा म्हणजे एक इस्लामिक शपथ (Islamic Oath) आहे. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आणि अधानचा भाग आहे. त्यांचा अल्लाहवरील विश्वास आणि प्रेषित मोहम्मद यांना दूत म्हणून स्वीकारण्याची घोषणा यातून प्रतीत होते. शहादामध्ये अरबीत लिहिले आहे, "कोणताही देव नाही, फक्त अल्लाह आहे आणि त्याचे पैगंबर फक्त मोहम्मद आहे!
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete