जागतिक इतिहासात हेरगिरीची अनेक प्रकरणे गाजली असतील. परंतु, भारतीय हेरगिरीचे एक प्रकरण सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. ते इथे देत आहोत. अनेक गुप्तहेरांनी भारताची सेवा केली आहेत. परंतु, कौशिक नावाच्या गुप्तहेराची देशसेवा एक उज्ज्वल इतिहास म्हणून भारतीयांच्या कायम स्मरणात राहील, यात शंकाच नाही.‘ब्लॅक टायगर’
राजस्थान राज्यातील श्रीगंगानगर जिल्ह्यात राहणार्या कौशिक नामक भारतीय गुप्तहेराची कहाणी संवेदनशील मनाला पाझर फोडणारी आहे. वयाच्या 23 व्या वर्षी ते भारतीय गुप्तचर संस्था रॉमध्ये सामील झाले. 1975 मध्ये त्यांना पाकिस्तानात पाठविण्यात आले. यावेळी त्यांना नबी अहमद शेख असे नाव देण्यात आले. त्यांची सुंताही करण्यात आली होती. कौशिक यांनी सुरुवातीला कराची येथील एका विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी स्नातक पदवी प्राप्त केली. यानंतर कौशिक पाकिस्तानी सैन्यात सहभागी झाले. ते पाकिस्तानी सैन्यात मेजर पदापर्यंत पोचले. त्यांनी सर्व परिस्थितींवर अशी मात केली की, कुणाला एकदाही त्यांच्यावर संशय आला नाही. दरम्यान, ते अमानत नावाच्या पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडले. लग्नानंतर त्यांना एक मुलगीसुद्धा झाली. पाकिस्तानची प्रत्येक चाल भारतीय सैन्यापर्यंत पोचविण्यात कौशिक यांचा हातखंडा होता. 1983 मध्ये रॉ या संस्थेने अन्य एक गुप्तचर कौशिक यांना भेटावयास पाठविला आणि इथेच घात झाला. तत्कालीन सरकारच्या भूमिकेवर अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आपले िंबग फुटल्याचे कळताच कौशिक फरार झाले. आणि त्यांनी भारतीय सरकारला मदत मागितली. परंतु, तत्कालीन भारत सरकारने कौशिक यांना ओळखण्यास नकार दिला. सर्व काही सुरळीत असताना कौशिक यांना तडकाफडकी फुटणारा माणूस भेटण्यासाठी पाठवलाच कशाला? असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणावरून अनेकांनी कॉंग्रेस सरकारवर टीकाही केलेली आहेत. वास्तविक कुठलाही हेर आपला जीव देईल पण देशाशी गद्दारी करणार नाही. मग, असा कमकुवत माणूस कौशिक यांना भेटण्यासाठी पाठवण्याचे प्रयोजन काय होते? अगदी सीमेवरच हा हेर पाकिस्तानच्या कचाट्यात कसा काय अडकला आणि त्याने कौशिकची माहिती विनाअट कशी काय पुरविली? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.
सुरुवातीला पाकिस्तानकडून कौशिक यांना गोपनीय माहिती पुरविण्याच्या अटीवर मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, कौशिक यांचा जन्म भारताशी बेईमानी करण्यासाठी झालाच कुठे होता? कौशिक यांनी अनंत अत्याचार सहन केले पण भारतमातेशी गद्दारी केली नाही. 1985 मध्ये त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, नंतर त्यांची सजा जन्मठेपेत परिवर्तित करण्यात आली. 2001 पर्यंत त्यांनी पाकिस्तानी अत्याचाराचा धीराने व संयमाने सामना केला. याचवर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि भारत देश एका सच्च्या देशभक्ताला मुकला.
भारतमातेच्या या वीर पुत्रास कोटी कोटी वंदन...
(छायाचित्र व माहिती स्रोत गूगलसंग्रह)
0 Comments