शिवरायांची आग्र्यातून सुटका .

Header Ads Widget

शिवरायांची आग्र्यातून सुटका .

           शिवाजीराजे ,शंभूराजे आग्रा शहरात पोहचल्याची व ते कोणत्या क्षणी दरबारात हजर होण्याची बातमी  औरंगजेब बादशहास मिळाली होती .रामसिंग त्यांना घेऊन निघाला .दोघंच्या वतीने ध्यावायचा नजराणा घेऊन सेवकवर्ग सोबत होते .बादशहा  व विशेषत ;बादशहाचे कुटुंब -महिलावर्ग उस्तुक तसाच मानसिक ताणवत हि होते .शिवाजीराजांना जादू येते ते कोणतेही रूप धरण करतात ,अचानक अदृश्य होऊन कुठेही निघतात ,साठ फुट लांब व सोळा फुठ उंच उडी मारतात .त्यांच्या शरीरावर कुठलेही शस्त्र चालत नाही ,अशा अनेक दंतकथा मोगलांच्या सैन्यात पसरल्या होत्या ,त्यामुळे चिंतेचे वातावरण होते .बादशाहने कार्यक्रम आटोपता घेऊन शिवाजी राजना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान ठेवले होते.शांत परंतु गंभीर वातवरणात मुख्य दरवाजातून शिवाजीराजे व त्यांच्या पाठोपाठ शंभूराजे दिवान-ए-आम मध्ये पोहचले .दरबार संपवून बादशहा व निवडक सरदार दिवान-ए-खास मध्ये होते .महाराजही तेथे पोहचले .त्यांची नजर  औरंगजेबवर खिळली .नजरानजर झाली.रामसिंगने सूचना केल्यानुसार शिवाजीराजे व शंभूराजे यांनी औरंगजेब बादशहास अभिवादन केले .
        आमचे आसन व स्थान कुठे आहे ?असे शिवरायांनी रामसिंगास विचारले .तोच दरबारचा सेवक समोर आला त्याने महाराजाचे स्थान दाखविले .ते स्थान केवळ दुय्यम दर्जाचे नसून आत्यंतिक अपमान करणारे होते .शिव्रय्च्या नावाचा धसका घेऊन पाळलेले अथवा पराजित झालेले अनेक मोगल सरदार शिवरायाच्या पुढे उभे होते .शिवाजी राजे बादशहाचे नोकर वा मांडलिक नव्हते ,ते बरोबरीच्या नात्याने आले होते .त्यामुळे शिवरायाचा राग अनावर झाला आणि ते कडाडले .सारा दरबार घाबरला .बादशहाचा अपमान झालेला पाहून काहीजण शिवरायाच्या अंगावर धावून आले .पण औरंगजेब ने इशारा देऊन त्यांना थांबविले .महिलावर्ग भयभीत झाले कारण यांना असे प्रसंग पाहण्याची सवय नव्हती .औरंगजेब उसने अवसन आणून बसला होता .शिवरायांनी बादशहासाठी आणलेले नजराणे फेकून दिले व पुन्हा गरजले ''रामसिंग तुमच्या बादशाहाला आमच्याशी कसे वागावे याचे रीतीरिवाज माहित नाहीत कि आम्हाला मुद्दामहून अपमानित केले गेले .अश्या लाजिरवाण्या अपमानित जगण्यापेक्षा मरण स्वीकारू .आम्ही या वागण्याचा धिक्कार करतो .चला आम्हाला बाहेर घेऊन चला .आता इथे पलभरही थांबायचे नाही ...'''अश्याप्रकारे संपूर्ण द्र्ब्रात घुमणारी गर्जना करून शिवाजी राजे गरकन वळून ताड-ताड बाहेर निघाले .बादशहाला पाठ दाखवायची नसते .हेच तत्वज्ञान माहित असलेला दरबार लट-लट कापत जागेवर थिजल्यासारखा उभा राहिला .रामसिंगाने बादशाहस कुर्निसात करून तो शिवराय च्या पाठीमागे निघाला .औरंगजेबची बोबडी वळली तर जनानखाना शिवरायांच्या स्वाभिमानाणे  दिपून गेला.
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/shivaji-maharaj-agra-meet.html
सौजन्य ;गुगल 

        शिवरायांना घेऊन रामसिंग त्या अंधारात त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आला .तो शिवरायाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता .पण त्याचे काही एक एकूण न घेण्याच्या मनस्थित शिवराय होते.शंभूराजे दरबारात थांबले होते .औरंगजेबने कार्यक्रम आटोपता घेतला व शिवाजी राज्यांवर पहारे बसविण्याचे आदेश दिले.रात्री रामसिंगला बोलवून औरंगजेबने तीव्र नाराजी व्यक्त केली .औरंगजेब चिडला होता पण त्याला काहीच करता येत नव्हते .शिवाजीराजांना कडक बंदोबस्तातत्यांच्या कोठीतच नजर कैद करून ठेवने एवढेच औरंगजेबला शक्य होते .ते त्याने केले शंभूराजे मोगलांचे मनसबदारच होते .त्यामुळे त्यांना कोणताही अटकाव नव्हता .रामसिंग डोळ्यात तेल घालून शिवाजीराजांना काही दगा -फटका होणार नाही याची काळजी घेत होते .शिवाजीराजे नजरकैदेत असले तरी रामसिंग त्यना भेटण्यासाठी काही सहकार्यांना परवनगी देत असे दिवस जात होते .औरंगजेब शिवरायांना सोडण्याच्या मानसिकतेत नव्हता .महाराज ,शंभूराजे व रामसिग यांना ह्या प्रसंगातून कसे बाहेर काढायचे याचा विचार करत होते .शिवाजी राजांनी आपणाला सोडत नसल्याने आपल्या सहकारयना सोडून देण्यात यावे असे पत्र औरंगजेबला पाठविले.औरंगजेब खुश झाला त्याला वाटले शिवाजीराजापासून जेवडे त्यांचे लोक दूर होतील तेवडा आपल्याला सोयीचे होईल .दरम्यान महराजांनी आग्र्याहून आपली सुटका होणार नाही याची खात्री राजना झाली असावी .त्यांनी सुटकेसाठी व तेथून सुखरूप स्वराज्यात राजगडला पोहचण्यासाठी जीजामातेसोबत झालेल्या चर्चेचा उपयोग कारवायाचे ठरविले .परीसारतील व आग्रा शहरातील प्रतिष्टीत लोक,सरदार ,व्यापारी ,सावकार यांच्या ओळखी होण्याच्या दृष्टीने  व त्यांची मदत होण्याच्या अनुषंग ने त्यांच्या दूतामार्फत नजराणे पाठवायला सुरवात केली .रामसिग व शंभूराजे तसेच इतर मुस्त्द्दी  सहकारी आग्रा परिसरात आवश्यक अफवा कुजबुज पद्धतीने पसरवत असे .आग्रा शहरातील मुक्काम वाढत चलाला आहे खर्च परवडत नाही रोकड संपत आली आहे असे औरंगजेबकडे पत्र पाठवत आणि कर्जरूपाने पैशाची मागणी करू लागले .परतणाऱ्या सहकार्यांना वाटेने लागणारा खर्च व प्रवास  परवाने मागितले .शंभूराजे शहरात फिरून -भेटून आपल्या जन्मजात राजनीतीचा वापर करू लागले व मोठ-मोठी रोकड कर्जरूपाने मिळवली .शहरातील मोठ-मोठ्या सरदारणा  शंभूराजे भेटले .त्यांच्या बालवयातील बुद्धिमत्तेने सारेजण भरून गेले .शंभूराजे हळूहळू औरंगजेब च्या मनातील भवना बदलवण्यास उतीर्ण झाले .त्यातून शंभूराजे त्यांच्या कुटुंबात शिरले .बादशहाच्या मुलीनी शंभूराज्यांचे कौतुक केले शिवरायांची खुशाली विचारली .आणि हेच जिव्हाळ्याचे संबध उपयोगात आणणे व्यवहारिक असल्याचे शंभूराजे यांना जाणवले .
         त्यांनी तसा विचार महाराजाच्या कानावर घातला .कोठीवरच्या सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखासह सर्व शिपायांना मोठ्या रोकड रकमेच्या भेटी दिल्या ,याशिवाय हिरे-मोती-सोने अश्या स्वरुपात आकर्षक नजराणे दिले.शिवराय,शंभूराजे व प्रमुख सहकारी यांचे आचरण कुठेही बंडखोरीचे व संशयास्पद नव्हते .काही दिवसात शिवाजीराजे यांची मानसिकता बदलेल व ते बादशाहच्या सेवेत रुजू होतील असे औरंगजेबला सतत सांगितले जायचे .शिवाजीराजानाही रामसिंगास आपल्या जीविताच्या जामिनीतून मुक्त करण्याचे औरंगजेबास कळविले .औरंगजेब बादशाहाही महाराजांना वायव्येकडील प्रांतात पाठवण्याचे ठरवत होता.महाराजांची मानसिकता बदलण्याची वाट पाहत होता .महराजांनी हि आपल्या जीवाला कसलाही धोका नसल्याचे व बादशाहवर आपला विस्वास असल्यचे कळविले .शंभूराजे यांनीही तशी हमी दिली .सगळीकडे असे व्ताव्र्ण तयार झाले व त्यमुळे शिवरायावरचा विश्वास वाढू लागला .सुरक्षा व्यवस्था व बादशाह चे कुटुंबीय शंभूराजे यांनी पूर्ण पोखरून ठेवली होती .रामसिंगही आपल्या वडीलांच्या शब्दाला जागून राजपुताचा शब्द पाळण्यात कमी पडला नव्हता.आणि म्हर्जनी सोबतच्या सहकार्यांना सविस्तर सूचना देऊन,खर्चाची व्यवस्था करून,प्रवासाचे परवाने देऊन वेगवेगळ्या गटात विभागुनाग्र येथून परत पाठविले .जून व जुलै १६६६ मध्ये त्यांनी आग्रा सोडले .आता शिवाजीराजे व शंभूराजे अत्यंत निवडक सहकारी घेऊन आग्रा येथे होते ,अशी बातमी आग्रा शहरात पोहचली .शिवाजी राजे गायब होतात ,चमत्कार करतात अश्या अफवा वरचा लोकांचा विस्वासही उडाला .आग्रा शहरातील निवडक प्रतिष्टीत नागरिक ,व्यापारी ,सावकार ,बादशाहचे  निवडक उच्चपदस्थ अधिकारी यानाही शिवरायंची विचारपूस करण्याची परवनगी दिली .त्यामुळे लोकांची या जा कोठीवर सुरु झाली. नजराणे भेटवस्तू  यांची परतफेड होत होती .आपसापसा तला तणाव कमी विश्वासचे वातावरण तयार झाले.सुरक्षा  व्यवस्था हि ढिली झाली .
         १५ ऑगस्ट १६६६ ला शंभूराजे नेहमीप्रमाणे बाहेर पडले तिकडेच मुक्कामी राहिले .रामसिगकडे पाहुणचार आहे .१६ ऑगस्टला रात्री  परतले नाही .याचे कुणालाही नवल वाटले नाही .कुणी विचारपूसही केली नाही .१७ ऑगस्टला आग्रा शहरातकाही बाहेरचे व्यापारी -सावकार शिवरायाची विचारपूस करण्यास येणार आहे अशी सूचना सुरक्ष रक्षकाना देण्यात आली .त्यानुसार ते आले चर्चा झाली नवे व्यवहार ठरले .नजराणे -भेटीची देवान घेवाण झाली .मिठीचे वाटप झाले .सुरक्षा रक्षकांनाही हुद्द्यानुसार भेटी मिळाल्या .दुपारी -व्यापरी सावकार निघून गेले .याच व्यापारयंच्या  गराड्यात शिवाजी राजे बाहेर पडले ठरल्या ठिकाणी पोहचले .सावकार व्यापारी शिवरायंचेच  सहकारी होते  .सोबत शंभूराजे यानाही घेऊन येतो .त्यांना माहिती देतो .थोड्या वेळाने मदारी मेह्त्त्र व इतर सेवकांनी शिवरायान जेवण व मिठाई बांधली असून त्यांना बरे नसल्याचे सुरक्षा रक्षकाना सागितले .त्यांना खूप थकवा आला आहे उलट्या होत आहे .त्यमुळे ते काढा घेऊन ते विश्रांती घेत आहे .रात्रभर झोप झाल्यावर उद्यापर्यंत बरे वाटेल .तेव्हा आता उद्या दुपारपर्यंत कुणालाही आत पाठू नका ,असे सेवक मदारी मेह्त्तर यांनी सुरक्षा रक्षकाना सांगितले .त्यानाही बरे झाले ,दगदग कमी होईल याचा आनंद झाला .त्यांनी कोठीच्या आवाराचे फाटक बंद करून घेतले .
       १८ ऑगस्टला सकाळी मदारी मेह्त्तर मधून-मधून आत दवापाणी घेऊन फिरताना ,मधेच शिवरायांचे अंग चेपताना ,दार किलकिले करून सुरक्षा रक्षकांना आता राजना बरे वाटते सागताना दिसत होते .बाहेर पूर्ण सामसूम शांतता होती शिवाजीराजे आजारी असल्याचे चर्चा सुरक्षा रक्षा सोबत सुरु झाली .आता ते आणखीच निवांत झाले.तेवढ्याच लगबगीने हिरोजी फर्जद व मदारी मेह्त्तर  बाहेर आले व त्यांनी कोठीचे दर ओढून घेतले .सुरक्षा प्रमुखास राजे झोपले आहेत .इतर सेवक कामात आहेत ,राजना त्रास होईल अश्या हालचाली करू नका ,त्यांच्या खोलीचा दरवजा बंधच ठेवा .आम्ही तातडीने काही औषधी व वस्तू घेऊन येतो ,असे सांगून दुपारी बाहेर पडले सायंकाळ होऊन होऊन दिवस मावळतीकडे झुकला .तरी हिरोजी व मदारी परतले नाही .सायंकाळचा पाहरा बदलण्यासाठी व हजरी घेण्याकरिता कोतवाल आला .कोठीत स्मशान शांतता होती .राजना बरे नाही व त्याचे सेवक बाजारात दवा-पाणी आणण्यास गेले ,अशी माहिती सुरक्षा रक्षकाणे दिली .आपणही राजाची विचारपूस करावी म्हणून कोतवाल कोठीत गेला .राजे झोपले होते त्या खोलीचा दरवाजा थोडा उघडला .पलंगावर राजे पायापासून डोक्यापर्यंत सर्व अंग चादरीने झाकून झोपी गेले आहेत असे दिसले .त्याने सेवकास आवाज दिला आतून हालचाल दिसली नाही .सुरक्षारक्षकास खोलीत पाठवून राजांना उठवायला सांगितले हाक मारून राजे उठले नाही .थकून गाढ झोपी गेले असावेत असे रक्षक म्हणाला .फौलादखान कोतवाल दर उघडून स्वत आत गेला व पलंगाशेजारी उभे राहून राजे -राजे म्हणत राजांना जागे करू लागला .हालचाल नव्हती .त्याने इतर सुरक्षा रक्षकास बोलवून चादर न काढता हात लाऊन हलविण्याचा प्रयत्न केला .नि त्याच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या .त्यने खरकन चादर बाजूला फेकली .चादरीच्या खाली कुणीही माणूस नव्हता तर एकमेकावर ठेवलेल्या लोड -उश्या होत्या .,त्याच्या समोर काजवे चमकू लागले .
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/shivaji-maharaj-agra-meet.html
सौजन्य;गुगल

 शिवाजीराजे पळाले......शिवाजी राजे पळाले.....जिकडेतिकडे शोधाशोध सुरु झाली .
(संदर्भ-शिवचरित्र ;-पुरुषोत्तम खेडकर )
___________________________________________________________________________________

___________________________________________________________________________________

राणा पूंजा भील .

Post a Comment

0 Comments