शिमला करार ,पाकिस्थानी सैनिकांचे आत्मसमर्पण.
Shimla Agreement, Surrender of Pakistani Troops.
साल १९७१ ला झालेल्या भारत-पाकीस्थान १३ दिवसच्या युद्धानंतर दोन्ही देशांनी 'शिमला करारावर''सह्या केल्या पाकिस्थांचे तब्बल ९३,००० सैनाकाचे आत्मसमर्पण त्या दिवशी झाले थोडक्यात पाकिस्थांनचे ९३,००० युद्धबंदी न मुक्त करण्यात आले .जगातील सर्वात मोठे आत्मसमर्पण पैकी हे एक ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात मोठे आत्मसमर्पण म्हणता येईल .
सौजन्य;-गूगल |
करार ;
यामध्ये पाकीस्थान च्या बाजूने 'जुल्फिकार भूत्तो, तर भारताच्या बाजूने श्रीमती ' इंदिराजी गांधी ,यांनी सहभाग गेटला होता .जुल्फिकार भूत्तो आपली मुलगी 'बेनझीर भूत्तो ,सहित २८ जून १९७१ ला शिमला येथे आले होते .मित्रानो ,तुम्हाला मी एक खास आठवण करून देऊ इच्छितो ती म्हणजे ,हे तेच भुत्तो आहेत जे म्हंटले होते कि ,भारता सोबत लढण्यासाठी मी हजारो वर्ष गवताची भाकरी खाण्यास तयार आहे .
२८ जून ते १ जुलाई पर्यंत दोघामध्ये खूप प्रकारच्या वार्ता झाल्या पण योग्य निर्णय झाला नाही ,त्याचवेळेस २ जुलाई ला लंच ब्रेक च्या अगोदर दोन्ही पक्षात समजौता झाला आणि चर्चा अखेरीस आली .
सौजन्य;गुगल |
करारातील साधरण मुद्दे ;
आपले सगळे काही मिळवून पाकीस्थान ने एक खोटे आश्वासन भारताला दिले .
यातील काही महत्त्वाचे मुद्दे ;
- भारत आणि पाकीस्थान या दोघातील जे सर्व विवाद आहे ते सर्व आपसात सोडवले जातील .
- १७ डिसेंबर १९७१ अर्थात पाकीस्थान च्या आत्मसमर्पण च्या नंतर दोन्ही सेना ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत 'नियंत्रण रेषा , मानली जाईल .
- कोणताही देश या रेषेला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही .
पाठ फिरताच विश्वास घात ;
मात्र पाकिस्तानात पाऊल ठेवताच भुट्टो यांनी काश्मीरबद्दल कुठलेही आश्वासन दिल्याचे नाकारले. भारत काही युद्धकैदी घेऊन बसणार नाही, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले आणि तसेच झाले. भारताने लवकरच युद्धकैद्यांची सुटका केली. भुत्तोंच्या गोड बोलण्यात व खोट्या वचनांच्या सापळ्यात पंतप्रधान गांधी अडकल्या, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर काहींनी या कराराने ‘व्हर्सायच्या तहासारखे’ सूडचक्र निर्माण केले नाही, म्हणून यशस्वी करार म्हटले आहे.
भुट्टोना भेटण्यापूर्वी पंतप्रधान गांधी यांनी प्रसिद्ध गुप्तहेर प्रमुख आर. एन. काव यांना विचारले होते, ‘मी भुत्तोंवर विश्वास ठेवायला हवा का? लोक असे म्हणतात की, भुट्टोशी हस्तांदोलन केले तर त्यानंतर हाताची सगळी बोटे जागच्या जागी आहेत याची खात्री करून घ्या.’
इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी' अतिशय दुर्दैवी अंत .Italian dictator Benito Mussolini 'very unfortunate end.
0 Comments