Who is married to Shrirampur cricketer Zaheer Khan?श्रीरामपूरचा क्रिकेटपटू 'झहीर खान ,चे लग्न कोण बरोबर ?

Header Ads Widget

Who is married to Shrirampur cricketer Zaheer Khan?श्रीरामपूरचा क्रिकेटपटू 'झहीर खान ,चे लग्न कोण बरोबर ?

 क्रिकेटपटू झहीर खान ( Zahir khan) मुळ रहिवासी श्रीरामपूर, जि. अहमदनगर , हे नाव भारताच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये घेतले जाते. भारतीय संघाच्या यशामध्ये त्याने मोठे योगदान दिले आहे. क्रिकेटच्या मैदानावर तो जितका यशस्वी राहिला, तितकाच तो प्रेमाच्या पीचवरही राहिला. त्याची पत्नी सागरिका घाटगे बॉलिवूड अभिनेत्री असून राजघराण्यातील आहे. सागरिकाला चक दे ​​इंडियामधील प्रीती सबरवालच्या भूमिकेतून नवी ओळख मिळाली.

सागरिका ही मूळची कोल्हापूरची, जन्मही कोल्हापुरातला... विजयसिंह घाटगे असं तिच्या वडिलांचं नाव... फारच थोड्या लोकांना माहिती आहे की सागरिका राजघराण्यातील मुलगी आहे. शाहरुख खान ( shahrukh khan) सोबत तिचा ब्लॉकबस्टर हा चित्रपट पण हिट झालेला आहे.

चित्रस्रोत : टिव्ही -9

सागरिका आणि झहीर एका मित्राच्या पार्टीत भेटले. तिथे दोघांमध्ये मनसोक्त चर्चा झाली आणि त्यानंतर मैत्री पुढे सरकली. बरेच दिवस दोघेही चोरुन-लपून एकमेकांना भेटत राहिले. अशातच युवराज सिंगच्या लग्नात दोघं जोडीने गेले आणि त्यांच्यातलं नातं जगासमोर आलं.

जवळपास 9 महिने डेट केल्यानंतर झहीर आणि सागरिकाने आयपीएल -2017 दरम्यान लग्नाचा निर्णय जाहीर केला. 23 नोव्हेंबर 2017 रोजी दोघांचे कोर्ट मॅरेज झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील ताज पॅलेसमध्ये रिसेप्शन ठेवलं ज्याला क्रिकेट जगतापासून चंदेरी दुनियेतल्या ताऱ्यांनी हजेरी लावली.


चित्रस्रोत : टिव्ही -9

चक दे ​​इंडियामध्ये हॉकीपटूची भूमिका साकारणारी सागरिका ही राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. ती 'फीयर फॅक्टर', 'खतरों के खिलाडी'मध्ये देखील दिसली आहे. याशिवाय तिने बॉस या वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे.

सागरिका ही मूळची कोल्हापूरची, जन्मही कोल्हापुरातला... विजयसिंह घाटगे असं तिच्या वडिलांचं नाव... फारच थोड्या लोकांना माहिती आहे की सागरिका राजघराण्यातील आहे. तिच्या वडिलांची आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या नाते संबधात असल्याची माहिती मिळते.

(स्रोत ;- गुगल )

Post a Comment

0 Comments