आफ्रिकेच्या रवांडा देशातील 'गीटारमा सेंट्रल जेल'-
रवांडा देशातील गीटारमा सेंट्रल जेलची (Gitarama Central Prison) गणना जगातील सर्वात कुप्रसिद्ध आणि भयावह तुरुंगामध्ये केली जाते. आश्चर्य म्हणजे येथे तुरुंगातील सुरक्षा रक्षकांकडून नव्हे तर कैद्यांकडूनच कैद्यांना धोका असतो.
या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीच इतर कैद्यांना जीवानिशी मारतात. असं म्हटलं जातं की येथील कैदी इतर कैद्यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे मांस खातात.
|
(चित्रस्रोत: पत्रिका डॉट कॉम) |
गिटारमा तुरुंगातील कैद्यांची संख्या (क्षमता) 600 इतकी आहे. मात्र येथे 7000 हून अधिक कैद्यांना डांबून ठेवण्यात येते. या तुरुंगात कैद्यांना जागा मिळत नसल्याने त्यांना रात्र-दिवस उभे राहूनच काढावे लागतात. अनेक कैद्यांना ओल्या जागेवर किंवा गलिच्छ ठिकाणी उभे रहावे लागते. त्यामुळे ते दुर्धर आजारांना बळी पडतात.
|
(चित्रस्रोत: पत्रिका डॉट कॉम)
|
या तुरुंगात दररोज जवळपास 8 कैद्यांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारांमुळे होतो. मानवाधिकार संघटना व अनेक सामाजिक संघटनांनी या तुरुंगाविरोधात आवाज उठवला. पण तरीही येथील कैद्यांचे राहणीमान सुधारलेले नाही.
रशियातील 'ब्लॅक डॉल्फिन' तुरुंग-जगातील वेगवेगळ्या देशांमधील सर्वात वाईट तुरुंगामध्ये रशियातील 'ब्लॅक डॉल्फिन' तुरुंगाचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. रशिया आणि कझाकिस्तान सीमेवर असलेल्या या तुरुंगातील नियम जगात सर्वात कठोर आहेत. या तुरुंगातून आजपर्यंत एकही कैदी फरार होऊ शकला नाही.
|
|
(चित्रस्रोत: लोकमत) गुन्हे विश्वात तर असं म्हटलं जातं की शिक्षा झालेला कैदी एकदा या तुरुंगात गेला तर मरेपर्यंत बाहेर येत नाही. येथे हत्या, बलात्कार व देशद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. या तुरुंगाला 1700 वर्षांचा इतिहास आहे. तुरुंगाचं नाव 'ब्लॅक डॉल्फिन' असण्याचं कारण या तुरुंगात एक डॉल्फिनची मूर्ती आहे. तुरुंगातील नियम इतके कठोर आहेत की इथे कैद्यांना आराम करण्यास मनाई आहे. त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बसू दिलं जात नाही.
| (चित्रस्रोत: लोकमत) या तुरुंगात एकत्र 700 कैदी ठेवले जातात. तुरुंगातील कैदी 24 तास कॅमेऱ्यात कैद होत असतात. येथील प्रत्येक सेलचा रस्ता तीन स्टीलच्या दरवाज्यांमधून जातो. तुरुंगाच्या आतील परिसरात फिरतेवेळी प्रत्येक कैद्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते तसेच हातही बांधलेले असतात. डोळ्यांवर पट्टी, हात बांधलेले आणि कंबर वाकलेली असल्याने कैद्यांना तुरुंगाच्या ले-आउटचा अंदाजही घेता येत नाही.तुरुंगात कॅन्टीनची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना त्यांच्या सेलमध्येच जेवण दिलं जातं. येथे 50 स्क्वेअर फुटाच्या सेलमध्ये दोन कैदी राहतात. दर 15 मिनिटांनी सेक्युरिटी गार्ड प्रत्येक सेलची तपासणी करतात. ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, असे कैदी याठिकाणी ठेवले जातात. या तुरुंगातील कैदी इतके क्रूर आहेत की 700 कैद्यांनी 3500 लोकांची हत्या केली आहे |
|
0 Comments