इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी' अतिशय दुर्दैवी अंत .Italian dictator Benito Mussolini 'very unfortunate end.

Header Ads Widget

इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी' अतिशय दुर्दैवी अंत .Italian dictator Benito Mussolini 'very unfortunate end.

 .Italian dictator Benito Mussolini 'very unfortunate end.

२९ जुलै १८८३ रोजी जन्मलेला बेनिटो मुसोलिनीला ‘फॅसिझम’ (कडवी राष्ट्रवादी हुकुमशाही विचारवाद) चा प्रणेता मानल जात.

तो १९०२ साली इटलीतील बेरोजगारीमुळे उदरनिर्वाहासाठी स्वित्झरलॅंडला गेला, तेथील समाजवादी राजकारणाने प्रभावित झालेला मुसोलिनी १९०४ साली इटलीत परतला व पत्रकार म्हणून काम करू लागला. पहिल्या महायुध्दाच्या काळात १९१५ साली इटली सैन्यात भरती झाल्यावर त्याची समाजवादाशी नाळ तुटली. त्याच्या फॅसिझमचा उदयही पहील्या महायुध्दाच्या काळात झाला. १९१९ साली त्याने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. मुसोलिनीने २७ ॲाक्टोबरच्या रात्री आपल्या ३०,००० समर्थकांसह रोममध्ये तत्कालीन पंतप्रधान कार्यालयावर चाल केली, व राजीनाम्याची मागणी केली.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/italian-dictator-benito-mussolini-very.html

इटलीचा राजा व्हिक्टर एम्युनेलने तत्कालीन पंतप्रधानाला पदच्चुत करून मुसोलिनीला पंतप्रधान बनविले. व बेनिटो मुसोलिनी वयाच्या ३९ व्या वर्षी ३१ ॲाक्टोबर १९२२ रोजी इटलीचा पंतप्रधान झाला.

मुसोलिनी सैन्यामध्ये अत्यंत लोकप्रिय होता, व भडकाऊ भाषणांसाठीही प्रसिध्द होता. पुढे जाऊन मोठे युध्द करायचे असल्याने लोकसंख्या मध्ये वाढ करणे हा त्याच्या प्रमुख धोरणांचा भाग होता. आपल्या भाषणांमधूनही तो आफ्रिका व आशियाच्या वाढत्या जन्मदराचा प्रकर्षाने उल्लेख करायचा.

मुसोलिनीने थोड्याच काळात १९२४ साली acerbo law आणून सर्व सत्ता स्वतच्या ताब्यात घेतली. तसेच विरोधकांची व प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्यास सुरवात केली. मुसोलिनीने देशाच्या आर्थिक नाड्याही स्वत:च्या हाती ठेवल्या होत्या. १९२५ साली त्याने ड्युस ही पदवी धारण करून इटलीला सर्वशक्तिमान बनवण्याची शपथ घेतली.

मुसोलिनीने १९३५ साली पूर्व आफ्रिकेतील इथिओपियावर आक्रमण करून तो प्रदेश ताब्यात घेतला. स्पेन मधील गृहयुध्दातही त्याने हुकुमशहा फ्रॅंकोची मदत केली.

१९३९ साली त्याने बलाढ्य जर्मनीचा हुकुमशहा हिटलरशी हातमिळवणी केली व इटलीमध्येही ज्यूंचा तसेच साम्यवाद्यांचा छळ सुरू केला. मुसोलिनी हिटलरएवढा बलाढ्य नव्हता पण मोक्याचा फायदा उठवणारा चाणाक्ष राजकारणी होता. जर्मनीने अत्यंत आक्रमकरित्या फ्रान्सवर केलेली चढाई पाहून यानेही दक्षिण बाजूने फ्रान्सवर आक्रमण केले व सत्तेत भागीदार झाला.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/italian-dictator-benito-mussolini-very.html
(मुसोलिनी व हिटलर)

 पुढेही जर्मनी एकामागून १ राष्ट्रे जिंकत असताना मुसोलीनीने बढाया मारून स्वत:चा ऊर भरून घेण्यापलीकडे काहीही केले नाही. अगदी ग्रीसनेही इटलीला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले होते मात्र जर्मन सैन्याने वेळीच येऊन ग्रीसच्या सैन्याचा धुव्वा उडवला व इटलीची इज्जत वाचवली . इटलीच सैन्य तुलनेत कमकुवत असल तरीही मुसोलिनी अजूनही त्याच्या देशात सर्वशक्तिमान असा नेता होता.

जर्मन सैन्य रशियात अडकल्यानंतर मात्र मुसोलिनीला उतरती कळा लागली. जुलै १९४३ सिसिली बेटावर दोस्त सैन्य उतरल्यानंतर त्याच्याच काही साथीदारांनी मुसोलिनीला पदावरून दूर केल व अटक केली. लगेच दोनच महिन्यात हिटलरच्या आदेशावरून जर्मन कमांडोजनी मुसोलिनीला सोडवून सुरक्षित स्थळी पोहोचवल. तदनंतर इटलीवर नाझी सैन्याने ताबा घेतला व मुसोलिनीला नामधारी पंतप्रधान घोषित केले.

१९४५ साली दोस्त सैन्याने पुन्हा एकदा इटलीचा ताबा घेतला व मुसोलिनीने स्वित्झरलॅंडला पळ काढला. २७ एप्रिल १९४५ रोजी तिथूनही स्पेनला पळ काढण्याच्या बेतात असलेल्या त्याला इटलीच्या साम्यवादी कार्यकर्त्यांनी शोधून काढल, व पुढच्याच दिवशी त्याला व त्याची प्रेयसी पेट्टाचीला गोळ्या घालून ठार केल.

२९ एप्रिलला त्याच व त्याच्या साथीदारांच प्रेत मिलानला एका प्रसिध्द चौकामध्ये आणले गेले. व त्यांना उलट लटकवण्यात आल.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/italian-dictator-benito-mussolini-very.html
(यामध्ये डावीकडून २ नंबरचा मुसोलिनी आहे.)

उलट लटकवल्यावर या प्रेतांवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. प्रेत उतरवल्यावर पण त्याची हेळसांड थांबली नाही. अनेक नागरिकांनी सडलेला भाजीपाला त्यावर टाकला काहींनी तर मुत्रविसर्जनही केल. 

त्याचा छन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाचा फोटो एका अमेरिकन पत्रकाराने घेतला होता तो आजही गुगलवर उपलब्ध आहे. (तो फोटो अत्यंत वाईट अवस्थेत असल्यामुळे तो मी इथे पोस्ट केला नाही.)

तर इटलीचा कूरकर्मा, २३ वर्ष इटलीवर एकहाती राज्य केल अश्या हुकुमशहाचा असा दुर्दैवी अंत झाला.

मुसोलिनीचा अंत एवढा दुर्दैवी होता की खुद्द हिटलरनेही त्याचा धसका घेतला. व दोस्त सैन्य बर्लिनमध्ये त्याच्या जवळ जवळ आल्यावर हिटलरने आत्महत्या करून स्वत:च्या व प्रेयसीच्या देहाची विल्हेवाट लावण्याचीही व्यवस्था करून ठेवली.

चित्रस्त्रोत - गुगल.

शिमला करार ,पाकिस्थानी सैनिकांचे आत्मसमर्पण.

राणा पूंजा भील .


 

Post a Comment

0 Comments