North Korea's 'dictator' Kim Jong Un is extremely ruthless in his actions.
उत्तर कोरियाचा 'हुकूमशहा'किम जोंग उन अत्यंत निर्दयी त्याचे कारनामे.
किम जोंग उन हा उत्तर कोरियाचा 'हुकूमशहा' असून सध्या त्याची प्रकृती ठीक नसल्याचे बोलले जाते.किम जोंग उन हा अत्यंत निर्दयी असून त्याचे कारनामे व त्याच्या देशातील नियम, कायदे संपूर्ण जगात कायम चर्चेत राहिले आहेत.या हुकूमशहाने आपल्याच देशातील लोकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. तसेच त्याने हायड्रोजन बॉम्ब तयार केला असून त्याच्या जोरावर जगाचा नाश करण्याच्या वेडाने तो झपाटलेला असतो.
source-google
किम जोंग उनने केलेले क्रूर अत्याचार-
- किम जोंग याने आपल्याच लष्करप्रमुखाची निर्दयपणे हत्या केली. या लष्कर प्रमुखाला 'पिरान्हा' माशांच्या टँकमध्ये फेकण्यापूर्वी त्याचे हात तोडण्यात आले. 'पिरान्हा' मासे समोरून पाहिल्यास भयानक दिसतात. या माशांचे दात अत्यंत टोकदार असतात. त्यामुळे ते क्षणार्धात माणसांचे मांस फाडतात. एका चित्रपटातील दृश्याने प्रेरित होऊनच किम जोंगने ही शिक्षा सुनावली, असे म्हटले जाते.
- आपल्याच सावत्र भावाची म्हणजे किम जोंग नम याची तो 'सीआयए' या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचा गुप्तहेर असल्याच्या संशयावरून मलेशियात हत्या घडवून आणली होती.
- किम जोंग उनच्या राज्यारोहण समारंभाच्या वेळी समारंभात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यावेळी देशातील सर्वांच्या घरांना कुलूप लावण्याचा हुकूम निघाला होता. एवढेच नव्हे तर समारंभ होईपर्यंत लग्नकार्य करण्यास बंदी होती. तसेच अंत्यसंस्कारासाठी बाहेर पडण्यासही बंदी होती.
- उत्तर कोरियात 'पोर्न फिल्म' पाहिली तर थेट मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली जाते. परदेशी चित्रपट, परदेशी गाणी आणि परदेशी टिव्ही चॅनेल पाहण्यास नागरिकांना बंदी आहे. कुणी पहिलेच तर त्याला फासावर लटकावले जाते आणि त्याचे घर जाळून टाकले जाते. देशात कोणालाही 'मोबाईल' वापरण्यास बंदी आहे. पर्यटकांनाही मोबाईल वापरण्यास बंदी आहे.
- देशात अनेक लोक उपाशी मरत आहेत. खेड्यापाड्यातील लोक तर गवत खाऊन दिवस काढतात, असे सांगितले जाते. किम मात्र जनतेचा पैसा उधळत असून बंदुका, हायड्रोजन बॉम्ब या गोष्टींवर खर्च करत आहे.
- किम जोंगने आतापर्यंत हजारो लोकांना मृत्युदंड दिला आहे. त्याला सल्ला देण्याच्या आरोपावरून आणि कारस्थान रचल्याच्या संशयावरून त्याने आपल्या काकांनाही मृत्यूदंड दिला होता. त्याने त्यांना शिकारी कुत्र्यांच्या पिंजऱ्यात घालून मारल्याचे सांगितले जाते.
- किम जोंग उन नागरिकांना जबरदस्तीने लष्करात भरती करतो. युवकांनाच नव्हे तर युवतींनाही लष्करात भरती केले जाते. तसेच मनाप्रमाणे कधीही कुठेही युध्द करण्यासाठी पाठवले जाते.
- एकदा बैठकीत झोपणाऱ्या आपल्या सरंक्षण मंत्र्यालाही किमने तोफेच्या तोंडी दिले होते. जे लोक त्याला आवडत नाहीत, त्यांच्याशी तो जनावराप्रमाणे व्यवहार करतो. अगदी आपल्या प्रेयसीला सुध्दा केवळ ती रागावली म्हणून ठार मारले होते.
- या हुकूमशहाला कोणीही जिन्स पॅन्ट घातलेली खपत नाही. स्वतः किम मात्र प्रचंड 'भोगवादी' असून आपल्यासोबत तो नेहमी 14–15 अविवाहित मुली ठेवतो. तत्पूर्वी या मुलींची वैद्यकीय चाचणी करून घेतो.
- त्याच्या 'टॉर्चर रूम' मध्ये दररोज अनेक लोक मरतात. रात्री तेथिल कैद्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात. या टॉर्चर रूममध्ये कैद्यांना सडलेले अन्न खाऊ घातले जाते. काही जणांना हात बांधून भिंतीवर किंवा टेबलावर आपटले जाते. गर्भवती महिला कैद्यांना सक्तीने गर्भपात करायला भाग पाडले जाते.
source-google किम जोंग उन याला उत्तर कोरियाचे सर्वोच्च पद वंशपरंपरेने मिळाले. मात्र त्याने संपूर्ण देशात दहशत माजवून धमकवायला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष उत्तर कोरियाकडे वेधले गेले. किम जोंग उन हा विकृत मनोवृत्तीचा हुकूमशहा म्हणून ओळखला जातो. राणा पूंजा भील . |
0 Comments