नेपोलियन बोनापार्टची सर्वात मोठी चूक !

Header Ads Widget

नेपोलियन बोनापार्टची सर्वात मोठी चूक !

           नेपोलियन बोनापार्टचे रशियावरील आक्रमण. जगातील सर्वांत कुशल सेनापती आणि धुरंधर राजकारणी समजल्या जाणाऱ्या नेपोलियनने अत्यंत खडतर अशा रशियावर आक्रमण करण्याची चूक केली आणि त्याचे अतिशय संहारक व मानहानीकारक परिणाम भोगले.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/napoleonbonaparte.html

        हजारो वर्षांपासून रशियाची 'युद्धामध्ये जिंकण्यास कठीण देश' अशी बाह्य जगामध्ये ख्याती आहे. प्रतिकूल हवामान, विरळ लोकवस्ती, प्रचंड आकार आणि विचित्र भौगोलिक परिस्थिती रशियाला युद्धात जिंकणे अतिशय अवघड बनवते. जगाच्या इतिहासात खूपच कमी सेनापतींनी रशियावर स्वारी करण्याचे धाडस दाखवले आहे.

       नेपोलियन बोनापार्ट इतर सेनापतींपेक्षा नक्कीच वेगळा होता. अख्खे जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा नेपोलियन रशियाच्या 'जिंकण्यास कठीण' ह्या प्रतिष्ठेला आव्हान देण्यास निघाला. काही कारणास्तव त्याचे रशियन झारशी (साम्राटाशी) मतभेद निर्माण झाले आणि त्याने १८१२ साली रशियावर पूर्ण ताकदीनिशी स्वारी करण्याचा निर्णय घेतला.

napoleon bonaparte

        ५ लाखाहून मोठी फौज आणि ५० हजारहून जास्त घोडे त्याशिवाय १ महिना पुरेल एवढे अन्नधान्य सोबतीला घेऊन त्याने रशियामध्ये प्रवेश केला. पण काही दिवस उलटले असतील नसतील तेच त्याला कळायला सुरुवात झाली की ही मोहीम सोपी नाही आहे. त्यांच्या मोहिमेतील अडथळा रशियाची सेना नव्हती तर भौगोलिक परिस्थिती होती. नेपोलियनचे युद्धतंत्र हे मुळात वेगवान हालचालींवर आधारित होते पण रस्त्यांच्या अभावामुळे त्याच्या सैन्याची कोंडी व्हायला सुरुवात झाली. तसेच काही दिवसांत अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. रशियन सैन्य बचावात्मक पवित्र्यात होती आणि प्रत्येक वेळी मागे फिरताना ते वाटेतील अन्नधान्याच्या स्त्रोतांची स्वतःच नासधूस करून जायचे. त्यामुळे मागून येणाऱ्या नेपोलियनच्या सैन्याला खायला काहीच भेटत नसे.

        थोड्याच दिवसात उपासमारीमुळे तसेच दूषित पाण्यातून झालेल्या संसर्गामुळे कित्येक सैनिक मृत्युमुखी पडू लागले. घोड्यांची अवस्था पण सारखीच झाली. पहिल्या महिन्याअखेरीस अंदाजे १० हजार घोडे मरण पावले.

तसेच उपासमार, रोगराई आणि सततच्या अपयशामुळे सैन्यामध्ये शिस्तीचा अभाव जाणवू लागला. ३ महिन्यानंतर जेव्हा नेपोलियनचे सैन्य मॉस्को शहरामध्ये पोचले तेव्हा २ लाखांहून जास्त सैनिक मृत्यू तरी पावले होते किंवा रोगांमुळे मृत्यूशी झुंज देत होते.

        पोलियनच्या सैन्याने जेव्हा रशियामध्ये प्रवेश केला होता तेव्हा हवामान उष्ण आणि शुष्क होते. ३ महिन्यानंतर आता रशियाच्या कुप्रसिद्ध हिवाळ्याला सुरुवात झाली होती. कित्येक ठिकाणी तापमान शून्य अंशाच्या खाली उतरत होते. नेपोलियनच्या सैन्याला ह्या हवामानाची सवय नव्हती. कित्येक सैनिक आजारी पडू लागले आणि मरणाच्या दाढेमध्ये अलगद प्रवेश करू लागले.

      ५ महिन्यांपूर्वी ६ लाखाहून जास्त सैनिकांची फौज आणि ५० हजार घोडे एवढी विशाल सेना घेऊन अवघ्या २ लाख सेना असणाऱ्या रशियाला फक्त २० दिवसांत नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने युरोपमधून निघालेला नेपोलियन जेमतेम १ लाख सैनिक जिवंत घेऊन परत फिरला. परिणामी आपल्या नावलौकीकाला एक कलंक लावून घेतला.

 राणा पूंजा भील .


Post a Comment

0 Comments