महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल आणि संस्कृती .

Header Ads Widget

महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल आणि संस्कृती .

महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल आणि संस्कृती .

प्राथमिक ओळख ; 

       सातपुडा प्रदेश' हा प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये हा प्रदेश विखुरलेला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातील पर्वतरांगांचा भाग सोडला तर सातपुडा पर्वतांच्या रांगा महाराष्ट्रात अमरावती, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत पसरलेल्या आहेत.
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/bhill.html
credit;google 

सातपुडा पर्वत रांगांमधील तापी व नर्मदा नद्यांच्या मधील पहाडी प्रदेश व आजूबाजूचा सखल व पर्वतमय प्रदेश 'भिलवाड' या नावाने ओळखला जात होता. सातापुड्यापासून विंध्य, अरवली पर्वतांच्या रांगांपर्यंत भिलवाड पसरलेला होता.

 वैदिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या ओळख ;

 
प्रभू रामचंद्र जेव्हा दंडकारण्यात आले तेव्हा त्यांना शबरी नावाची भिल्ल महिला भेटली होती हे

 आपणास रामायणात ज्ञात आहे. त्याकाळी या प्रदेशात राहणा-या लोकांना 'शबर', 'किरात',निषाद' या नावाने ओळखले जात असे. हे लोक दुसर-तिसरे कोणी नसून सातपुड्यातील निषाद' या नावाने ओळखले जात असे. हे लोक दुसर-तिसरे कोणी नसून सातपुड्यातील भिल्लच होते. महादेवाने जिचे प्रियाराधन केले अशा एका विलक्षण स्त्री पासून यांची वंशावळ सुरु झाली अशी एक पारंपरिक श्रद्धा आहे.


भिल्ल हि महाराष्ट्रातील ऐतिहासिकमहत्त्वाची व संख्येने एक प्रमुख आदिवासी जमात आहे.भारतातील प्राचीन शिलालेखांत आणि प्राचीन साहित्यात भिल्लांचे उल्लेख सापडतात. इतकी हि

पुरातन जमात आहे.

 भिल्ल व त्याची वैशिष्ट्य पूर्ण ओळख ;

गडद तपकिरी वर्ण, गोलगरगरीत चेहरा, रुंद व भलामोठा जबडा आणि सुदृढ कमावलेले शरीर हि त्यांची वैशिष्ट्ये होत.भिल्ल जमातीत काही पोटवर्ग आढळतात. त्यात भिल्ल गरासिया, ढोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, बरडा भिल्ल, डुंगरी=गरासिया, मेवासी भिल्ल, रावळ भिल्ल, तडवी भिल्ल, धानका भिल्ल आदींचा यात समावेश होतो.

धुळे जिल्ह्यात भिल्ल जमातीच्या अनेक शाखा आहेत. त्यात बरडे भिल्ल, मावची, वळवी, वसावे, पाडवी, पावरा,तडवी, धानका, लाढ्या भिल्ल, मथवाडी भिल्ल, बोंडे-गवाल भिल्ल, कोटले भिल्ल, टेड(धेड) भिल्ल, नाईक भिल्ल, गामित, मेवाशी भिल्ल, आदींचा समावेश होतो.

 आर्थिकदृष्ट्या भिल्ल हि स्थायिक शेतक-यांची जमात आहे. परंपरेने हि निष्णात तीरंदाजाची जमात आहे. बहुतांश भिल्ल हे कष्टकरी किंवा मजुरी करतात. काहीजण जंगली माळ गोळा करून त्याची विक्री करतात. ते चांगल्यापैकी शिकारी असून मासे पकडण्यात प्रविण आहेत. ते जाळ्यांचा तसेच सापळ्याचाही वापर करतात. शिकार करण्यासाठी तीर-कामठा व जाळी हि अस्रशस्त्र  ते वापरतात. खाण्यायोग्य कंदमुळे जमविण्याचे कामही केले जाते.

भिल्ल खाद्य संस्कृती व परंपरा  ;

भिल्लांच्या जेवणात भात, ज्वारीची भाकरी, तुरीचे वरण प्रामुख्याने असते.भिल्ल पुरुषांच्या कमरेला जेमतेम गुढघ्यापर्यंत पोहचेल एवढे आखूड नेसू गुंडाळलेले असते. अंगात कुडता व डोक्याला पागोटे असते. स्त्रिया कमरेभोवती जुनेर गुंडाळतात. अंगात चोळी घालतात व डोक्याला मुंडासे बांधतात. पुरुष व स्त्रिया दोघेही कानात चांदीच्या बाळ्या व बोटात चांदीची वेढणी घालतात. स्त्रिया दंडावर बुलीया, कंगना माला, नथनी आणि इतरप्रकारचे दागिने घालून नटतात.

आदिवासींच्या चालीरीतीनुसार त्यांच्यात बहुपत्नीत्व व प्रौढ विवाहाची पद्धती रूढ आहे. त्यांना विधवा विवाहही संमत आहे. विवाहाच्या वेळी नृत्यगायनाचा आनंदोत्सव साजरा होतो. यात मद्याची रेलचेल असते.

 सातपुड्यातील भिल्लांची पारंपरिक लग्न पद्धती मनोरंजक आहे. नवरा मुलगा मुलीला यात्रेत किंवा बाजारात पाहतो व लग्नाची मागणी घालतो. मागणीप्रमाणे लग्न जमले नाही तर मुलगा मुलीला तिच्या संमतीने पळवून नेतो. मुलीकडून हुंडा घेतला जात नाही. याउलट मुलाकडून मुलीला दहेज दिले जाते. हि रक्कम पाचशेपासून दोन हजारापर्यंत असू शकते. लग्नासाठी मुहूर्त पाहिला जात नाही. फक्त शनिवार व अमावास्येच्या दिवशी लग्ने लावली जात नाहीत. लग्न गावातला भगत लावतो. लग्नानंतर वधू-वर मांडवात नऊ फेरे मारतात. लग्नात सर्वांना जेवण व दारू दिली जाते.

भिल्ल आदिवसीची पूजा व रिवाज ;

भिल्ल लोकांच्या रितीरिवाजाप्रमाणे पाच महिन्यानंतर गर्भपात केल्यास तो गुन्हा समजण्यात येतो.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/bhill.html
credit;google

 वाघदेव, धानदेव, सर्पदेव, म्हसोबा, वेताळ, डोंगरदेव हे भिल्लांचे देव आहेत. त्यांची ते पूजा करतात. सातपुडातील भिल्लांच्या वाघदेव, रीमदेव, नंदुरा देव, पालुडा देव, बडादेव, याहामोगी इत्यादी देवदेवता आहेत. शिवाय प्रत्येक गावाच्या सीमेवर हिवारीया हा देव असतो. तर गावात 'बनीजाह' हे दैवत असते. पावसाळ्यात वाघ देवाचा सण साजरा केला जातो. या देवाला कोंबडी कापली जाते व पालेभाजीचा नैवद्यही दाखविला जातो. त्यानंतर भिल्ल रानातील पालेभाज्या खाण्याला सुरुवात करतात. रीम देवाचा सण शिवरात्रीला साजरा केला जातो.

 माहिती सौजन्य- डॉ. गोविंद गारे साहेब


 


Post a Comment

0 Comments