भिल्ल क्रांतीकारांचे स्वातंत्र्यसमर .Bhil Revolutionary War of Independence.

Header Ads Widget

भिल्ल क्रांतीकारांचे स्वातंत्र्यसमर .Bhil Revolutionary War of Independence.

 

भिल्ल वीरांचा स्वातंत्र्यलढा.


भिल्लांचा उठाव
  कालखंड :- 1817 ते 1857
  नेतृत्व :- चिलनाईक, काजीसिंग
  मुख्य ठिकाण :- अजिंठा, सातमाळा, सातपुडा
     यांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा या पर्वतरांगात असून सर्वात जास्त वस्ती खानदेशात असे व यावेळी तेथे कलेक्टर हा कॅप्टन ब्रीज हा होता.
 यावेळी त्यांनी अजिंठा, सातमाळा या भागात उठाव केले.
  1857 मध्ये काजीसिंग (खर्जासिंग) याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी खानदेशात उठाव केले व सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला.

  तसेच भिमा नाईक, भागोजी नाईक, दौलतसिंग, कुजरसिंग नाईक, नेवशा नाईक यांच्या नेवृत्वाखाली 1870 पर्यंत भिल्ल हे इंग्रजांविरुध्द लढा देत होते.


             भिल्लांच्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे वैशिष्ट्ये असे की त्यात संपूर्ण भिल्ल जमातीने सामूहिक भाग घेतला. त्यांच्या नेत्यांची कुटुंबेही संघर्षात सहभागी झाली. त्यांचे आईबाप, बायका, मुले एकत्रितपणे इंग्रजांशी लढत होते. संपूर्ण सातपुडा परिसर स्वातंत्र्याकांक्षेने इंग्रजाविरुद्ध  पेटून उठला होता.(भिल्ल क्रांतिकारी,भिल्ल उठाव )
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/Bhil-Revolutionary-War-ofIndependence.html
bhartiyadiwasi.blogspot.com

             भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक समाजगटांचा सक्रीय सहभाग होता. त्याला भारतीय जनजाती अपवाद कशा असतील? जनजाती समूहातून राष्ट्रीय पातळीवर अनेक उठाव झाले. त्यामध्ये बस्तरचा उठाव, संथाळाचा उठाव, उरॉवांचे आंदोलन, तंट्या भिल्लाचा उठाव, कोकणी जमातीचा उठाव असे प्रमुख उठाव आहेत. बिरसा मुंडा, वीर बुधू भगत, तंट्या भिल्ल, शंकर शहा, उमाजी नाईक, समशेर सिंग भोसले, छोटुसिंग लमाण, धर्मप्रताप वंजारी, हनत बाबा अशा नररत्नांनी इंग"जांशी संघर्ष केला. या संघर्षाची कारणं काय होती? कशासाठी त्यांनी हा संघर्ष केला?

        भारतातील जनजाती अगदी प्राचीन काळापासून स्वतंत्र वृत्तीने मुक्तपणे रानावनात निसर्गाशी एकरूप अवस्थेत जीवन जगत आले आहेत. त्यांनी कधीही दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारले नाही. स्वकियांच्या आणि परकियांच्या राजवटीतही जनजातीच्या मुक्ततेवर कोणतीही बंधने नव्हती. जनजातीची छोटी छोटी संस्थाने अबाधित ठेऊन त्यांच्यावर अंमल बसवला होता. इंग्रजांनी मात्र जनजातीची संस्थाने खालसा केली. जंगले अधिग्रहीत केली. तेथे वृक्षतोड केली. जंगलातील वृक्षतोड व गवत कापण्यासाठी शहरातील शेठ-सावकारांना कंत्राटे दिली. जंगल खाते निर्माण करून तेथे स्वत:ची सार्वभौम सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच जनजातीचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. वने सरकारच्या ताब्यात गेली. आणि वनउत्पादनेही त्यांचीच झाली. विविध करांचा बोजा मात्र जनजातीच्या डोक्यावर आला.(भिल्ल क्रांतिकारी ,भिल्ल उठाव )

सुप्त निखारा;-


           इंग्रजांच्या या दमननीतीमुळे समाजात खदखद निर्माण झाली आणि ती उमाजी नाईकांच्या रूपाने प्रकट झाली. 1826-28 मध्ये उमाजी नाईकांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. उमाजी नाईकांच्या उठावाची कारणे वेगळी होती. उमाजी नाईकांकडे पुरंदर किल्ल्याचे गडकरीपणाचे हक्क होते ते इंग्रजांनी नाकारले. यातूनच उमाजी नाईकांनी उठाव केला. 1827 साली त्यांनी जाहिरनामा काढला, ""या पुढे शेतसारा ब्रिटिशांना बिलकूल न देता तो उमाजी नाईकाला द्यावा. उमाजी नाईक त्यांचा उपयोग गोरगरिबांसाठी करतील.'' जनताही उमाजी नाईकांना मानत होती. 1831 पर्यंत उमाजी नाईकांनी ब्रिटीशफौजांशी लढा दिला. सातारा, ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यावर उमाजी नाईकांचे अधिराज्य होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी उमाजींचा उठाव मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. शेवटी मॉकिन्टॉश या स्वतंत्र सेनाधिकाऱ्यांची नेमणूक कंपनीला करावी लागली. मॉकिन्टॉशच्या प्रबळ सेनेपुढे उमाजी नाईकांचा टिकाव लागला नाही. उमाजी नाईकांना चारी बाजूंनी घेरले आणि उमाजी नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडले. पुण्याच्या सत्र न्यायालयात खटला चालला आणि 13 फेबु"वारी 1832 रोजी उमाजी नाईकांना फाशी दिली गेली.(भिल्ल क्रांतिकारी ,भिल्ल उठाव).
         उमाजींनी रामोशी समाजातील वीरांची सेना उभी केली होती. बेरड रामोशाच्या शौर्याचा सामना करताना ब्रिटिशांना नाकी नऊ आले. त्याचप्रमाणे सातपुडा, सातमाळा या भागातही ब्रिटिशांना जेरीस आणण्याचे काम भिल्ल वीरांनी केले. हिंदुस्थानात ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित होत असताना ते खान्देश आणि तापीच्या खोऱ्यातील आपली वसतिस्थाने सोडून सातपुडा, सातमाळ्याच्या डोंगररांगांत जाऊन राहिले. सातपुड्यात त्यांची विविध संस्थाने होती. 1819 पासून इंग्रजांनी आपल्या दमननीतीनुसार अनेक भिल्ल नाईक व सरदारांना ठार करायला सुरुवात केली. चोहोबाजूंनी नाकेबंदी केलेली असतानाही खंडू आणि रूपसिंग नाईक, चिला नाईक यांनी आपले शौर्य प्रकट केले. चिला नाईकाने खान्देशच्या पश्चिमेकडील ठाणे उद्‌ध्वस्त केले. तर तडवी भिल्लांनी तापी आणि सातपुड्याच्या मधील भूप्रदेशावर आपला अंमल प्रस्थापित केला. ब्रिटिशांनी या वेळी वेगळ्या नीतीचा वापर केला. या संघर्षात शरण येणाऱ्यांना नोकरीत ठेवण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे तापी खोऱ्यात पूर्वीप्रमाणे गाव वसवून राहण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. एका बाजूला हा उठाव आपण मोडून काढला असे ब्रिटिशांना वाटू लागले. तर दुसऱ्या बाजूला भिल्लांचे नवनवे नाईक उभे राहून हा लढा पुढे चालवू लागले.(भिल्ल क्रांतिकारी,भिल्ल उठाव)
         1822 साली सातपुड्यातील जहाल पेंढारी व सातमाळ्यातील भिल्ल यांनी एकत्रित येऊन उठाव केला. त्याचे नेतृत्व हिऱ्या नाईकाकडे होते. त्याने आपली मोठी सेना तीन तुकड्यात विभागली व भडगाव, एरंडोल या भागात दोन तुकड्यांची रवानगी केली. कॅप्टन बिग्ज याने 1823 साली या उठावाविरुद्ध मोहीम उघडली. हिऱ्या नाईक पकडला गेला. त्या नंतर पुढे दोन वर्षे हा संघर्ष चालू राहिला.(भिल्ल क्रांतिकारी,भिल्ल उठाव ).

ब्रिटिशांची कूटनीती


         भिल्लांचा उठाव शांत होत नाही हे पाहताच इंग्रजांनी नवे धोरण अवलंबिले. एलफिन्स्टन हा त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर होता. 1825 साली त्यांनी भिल्लांविषयीचे धोरण जाहीर केले. त्यानुसार त्याने भिल्लांचं पारिपत्य करण्यासाठी पाठविलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांना भिल्लांच्या संदर्भात सौम्य धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. पूर्वी ज्याप्रमाणे भिल्लाला निर्दयपणे ठार मारले जाई, पकडून त्यावर खटले भरले जात व फाशी दिली जाई, त्याप्रमाणे धोरण ठेवू नये असे आदेश दिले. भिल्लांच्या नाईकांशी सौजन्याने वागणे, त्यांना अनेकविध सवलती देऊन शेती करण्यास प्रोत्साहित करावे. भिल्लांना इंग"जी सेवेत घेण्यासाठी नोकरभरती करावी. त्याचप्रमाणे भिल्ल सैनिकांची स्वतंत्र तुकडी तयार करावी, असे मवाळ धोरण घेताना एलफिन्स्टनने हे ही बजावले की ""भिल्लांच्या टोळ्या अजूनही उठाव करीत आहेत. त्यांना अत्यंत कडक शासन करावे. जे लोक शरण येतील आणि समझोते करतील किंवा शस्त्रे खाली ठेवतील त्यांना पेंशनी द्याव्यात, नियमित वेतनाची तरतूद करावी. रस्त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांना देऊन आकर्षक मोबदला देण्यात यावा.(भिल्ल   क्रांतिकारी,भिल्ल   उठाव).
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/Bhil-Revolutionary-War-ofIndependence.html
bhartiyadiwasi.blogspot.com


        एका बाजूला हा उठाव शांत करायचा आणि दुसऱ्या बाजूला भिल्लांवर आपला अंमल प्रस्थापित करायचा, असा हा दुहेरी डाव होता. या धोरणानुसार नऊ भिल्ल माणसे लेफ्टनंट ऑऊट्रॉम यांच्या गळाला लागली. या नऊ जणांच्या मदतीने ब्रिटीशभिल्ल समाजात आपले बस्तान बसवू लागले. 1827 पर्यंत ब्रिटिशांना भिल्लांची एक रेजिमेंट तयार करण्यात यश आले. भिल्लांना उच्चपदावरच्या जागा दिल्या गेल्या. कारण इंग"जांच्या दृष्टीने बंडखोर असणाऱ्या भिल्लांच्या बंदोबस्तासाठी भिल्ल सैनिकांचाच वापर करण्याचा डाव योजनापूर्वक आखण्यात आला.(भिल्ल   क्रांतिकारी भिल्ल   उठाव )

धग कायम राहिली

           भिल्लांसाठी ब्रिटीशअसे धोरण राबवत असले तरी भिल्ल वीरांनी शौर्याची धग कायम चेतवत ठेवली. सातपुडा आणि सातमाळा डोंगररांगांच्या आधाराने राहणाऱ्या भिल्ल वीरांनी आपला लढा चालू ठेवला. 1826 मध्ये भडगाव आणि सुल्तानपूर या मोठ्या गावांवर हल्ले करण्यात आले. धावसिंग आणि सुभाण्या यांनी सिंदवा खिंड पूर्णपणे बंद करून टाकली. तेथून कोणतीही वाहतूक होत नव्हती. या दोघांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले. पण काही काळात त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली आणि पुन्हा उठाव केला. देवचंद नाईक या उठावात हुतात्मा झाला. अखेर सुभाण्या नाईकला पकडण्यात आले आणि धुळे कारागृहात ठेवले गेले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. 1811 मध्ये तडवी भिल्लांनी उत्तर-पूर्व खान्देशात हल्ले केले. ब्रिटिशांबरोबर चकमक झाली. त्यात 469 तडवी सैनिकांना कैद करण्यात आले. 1841 मध्ये अहमदनगर येथील भिल्ल वीरांनी पिंपळनेर येथील इंग"जांचा खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. मोठी चकमक झाली. भिल्लांचा पराभव झाला. त्याचवर्षी ब्रिटिशांच्या सेनेतून फुटून भागण्या नाईक याने उठाव केला. नर्मदाकाठी भागण्या नाईकची सेना आणि ब्रिटीशयांची गाठ पडली. या चकमकीत भागण्या नाईकला गोळी लागली. काही भिल्ल मारले गेले. 1842 साली तडवी भिल्लांनी बेकाऱ्या व भागचंद यांच्या नेतृत्वाखाली सावदा व यावल या मोठ्या गावावर हल्ले केले. परंतु त्यांचा पराभव झाला. भागचंद मारला गेला तर बेकाऱ्याला ब्रिटिशांनी कैद केले.
     ब्रिटिशांनी आपल्या सैन्यात भिल्ल्लांना जाणीवपूर्वक प्रवेश दिल्याने इंग्रज सेनेचे बळ वाढले होते. "कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काल' या म्हणीप्रमाणे इंग्रजी सेनेतील भिल्लांच्या मदतीने स्वातंत्र्यप्रेमी भिल्लाचा पाडाव करण्यात यश मिळू लागले. 1846 ते 1852 या काळात कोणताही मोठा उठाव झाला नाही. सगळे आलबेल आहे, असे वाटत होते. पण स्वातंत्र्यप्रेमी भिल्ल अस्वस्थ होते. त्यांच्या मनात खदखद होती. मनातील या उद्रेकांना वाट करून देण्यासाठी योग्य त्या अनुकूल काळाची वाटत पाहावी लागणार होती. या संधीची वाट पाहत सातपुड्यातील भिल्ल समाज हळूहळू पुन्हा संघटित होत होता.(भिल्ल   क्रांतिकारी,भिल्ल   उठाव )

स्वातंत्र्याची फुंकर - निखारा फुलला

         1857 मध्ये संपूर्ण हिंदुस्थान पेटला. ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यसमर छेडले गेले. तेव्हा सातपुडा-सातमाळ्यातील भिल्ल शांत राहणे शक्यच नव्हते. अनेक वर्षे मनात दाबून ठेवलेला असंतोष उफाळून आला. या उद्रेकांचा वणवा पेटला. त्याला नेतृत्व लाभले भागोजी नाईक व कजरसिंग नाईक यांचे. इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भिल्लांनी आपले सेना उभी केली. तिची अंदाजे संख्या दीड हजाराएवढी होती. यासाठी लागणारी कुमक उभी करावी लागणार होती. भिमा नाईक व काजी नाईक यांनी इंदूरहून शिरपूरमार्गे मुंबईकडे जाणारा 7 लाखांचा खजिना 17 नोव्हेंबर 1857 रोजी सेंदवा घाटात लुटला. 200 इंग्रज सैनिकांवर 300 भिल्ल वीरांनी हल्ला करून इंग्रजांना हादरा दिला. याच वेळी अफूने भरलेल्या 60 गाड्याही लुटण्यात आल्या.(भिल्ल  क्रांतिकारी,भिल्ल   उठाव )
        सेंदवा घाट भिल्लांच्या ताब्यात राहणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. पण डोंगर माथ्यावर भिल्लांशी लढणे शक्यही नव्हते. भिल्लसेना खाज्या नाईकांसोबत अंबापाणी येथे आहे हे कळताच इंग"जांनी तिकडे मोर्चा वळवला. भिल्ल वीरांनी दगड-गोट्यांचा मारा केला. यात 2 अधिकारी व 16 सैनिक मारले गेले. 65 भिल्लांना हौतात्म्य आले. खाजा नाईकचा मुलगा फौलाद सिंग मारला गेला. या लढाईत केवळ भिल्ल वीरांनीच भाग घेतला असे नाही तर 400 भिल्ल विरांगनाही सहभागी झाल्या. त्यांना कैद केले गेले. दौलत सिंगाच्या सुनेला लष्करी ढोल वाजवून ठार करण्यात आले. खाजा नाईकला बिनशर्त माफी जाहीर करण्यात आली. पण तो शरण आला नाही.
      काजीसिंग यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला हा उठाव स्वातंत्र्य समराचा एक भाग होता. 1857-58 मध्ये उत्तर हिंदुस्थानात तात्या टोपेंनी केलेल्या सशस्त्र उठावाशी या उठावाचा संबंध होता. काजीसिंग व भागोजी  नाईक यांचे तात्या टोपेंशी संबंध होते असे संकेत ब्रिटिशांच्या कागदपत्रावरून मिळतात. 3 नोव्हेंबर 1858 मध्ये तात्या टोपे खान्देशावर चालून येत आहेत अशी बातमी आली. खान्देशात काजीसिंग, भागोजी यांनी उठाव करावा, ब्रिटीश सेनेला जेर करावे आणि उत्तरेकडून तात्या टोपे यांनी खान्देशात प्रवेश करावा अशी योजना होती. सर ह्यू रोज याने अक"ाणी मार्गे खान्देशात येणाऱ्या तात्या टोपेंना अडवले. त्यामुळे तात्या टोपे आपल्या सैन्यासह खांडव्यात परतले. काजीसिंग आणि भागोजी नाईक हे एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे सगळाच बेत फसला. भागोजी नाईकाप्रमाणे भीमा नाईक हा देखील 1857 च्या स्वातंत्र्य समरातील प्रमुख भिल्ल सरदार होता. भीमा नाईकाला पकडण्यासाठी 1000 रुपयाचे इनाम ब्रिटिशांनी जाहीर केले होते. 28 सप्टेंबर 1857 मध्ये ईस्ट इंडिया सचिवांना पाठवविलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे की, ""भीमा नाईक हा दिल्लीच्या बादशहाच्या आदेशाने इंग्रजांशी लढत आहे. त्यानेच लेफ्टनंट केनडीच्या सैनिकी तुकडीवर हल्ला केला आहे.'' 30 ऑक्टोबर 1857 एस. मॅन्सफिल्ड या खान्देशातील न्यायाधीशाने आपल्या पत्रात लिहिले आहे,"" भीमा नाईक कजरसिंग त्याचप्रमाणे भिल्ल जमातीच्या इतर नाईकांनी त्यांच्या दीड हजार अनुयांसह शिरपूरवर हल्ला केला. भिल्लांचा पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे तेथील कॅप्टन बर्च सुलतानपूर जिल्ह्याकडून सैनिकांकडून मदत मिळवली.'' या ब्रिटिशांच्या पत्रावरून सातपुड्यातील वीर भिल्लांनी आपला वचक कसा निर्माण केला होता हे लक्षात येते.(भिल्ल  क्रांतिकारी,भिल्ल उठाव )
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/Bhil-Revolutionary-War-ofIndependence.html
bhartiyadiwasi.blogspot.com

 

           भिल्लांचा उठाव काबूत येत नाही म्हटल्यावर ब्रिटिशांनी कूटनीती मार्ग स्वीकारला. भागोजी नाईकांच्या आईला कैद केले. या मागची भूमिका ब्रिटिशांच्या एका पत्रातून स्पष्ट होते. भिल्ल महिलांविषयी त्यात लिहिले आहे, ""त्या भिल्ल जमातीच्या पुरुषांसार"याच उपद्रवकारक आहेत. त्या माहिती मिळवतात. पुरुषांपर्यंत पोहोचवतात. स्वयंपाक करतात आणि प्रसंग पडल्यास हातात शस्त्रे घेऊन युद्धही करतात. त्यामुळे भागोजी आणि इतर नाईक हाती लागेपर्यंत त्यांना बंदिस्त ठेऊन ओलीस ठेवावे म्हणजे भिल्ल नाईक लवकर शरण येऊ शकतील.''
भिल्लांच्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे वैशिष्ट्ये असे की त्यात संपूर्ण भिल्ल जमातीने सामूहिक भाग घेतला. त्यांच्या नेत्यांची कुटुंबेही संघर्षात सहभागी झाली. त्यांचे आईबाप, बायका, मुले एकत्रितपणे इंग"जांशी लढत होते. संपूर्ण सातपुडा परिसर स्वातंत्र्याकांक्षेने इंग"जांविरुद्ध पेटून उठला होता.
लोण पसरले
        सातपुड्याप्रमाणेच 1858 मधे पाचोड, यावल परिसरात भिल्लांनी इंग्रज शासनास आव्हान दिले. इंग"जांनी सैन्याच्या तुकड्या वाढवून भिल्लांना घेरले. तेरा भिल्ल पकडले गेले. यावल प्रमाणे नगर जिल्ह्यातही उठाव झाला. नांदगाव येथे इंग्रजांना भिल्लांशी लढावे लागले. नगर जिल्ह्यात इंग"जांनी भिल्लांची धरपकड केली. काहींवर राजद्रोहाचा खटला चालवून देहांताची शिक्षा सुनावली. महादेवाच्या डोंगरावरील भिल्लही संघटित झाले. हरजी नाईक व पुतोजी नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा दिला गेला.(भिल्ल   क्रांतिकारी,भिल्ल   उठाव ).

योद्धे गुन्हेगार झाले

         1857 च्या स्वातंत्र्य समरात इंग्रजांना जय मिळाला. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या जनजातीचे उठाव मोडून काढले गेले. खान्देशातील सातपुडा, सातमाळा परिसरातील हजारो स्वातंत्र्यवीरांना फाशी दिली गेली, तोफेच्या तोंडी दिले, क्रूरपणे गोळ्या घातल्या. हा सगळा इतिहास रोमहर्षक आहे. पुन्हा अशा प्रकारचा उठाव होऊ नये याची काळजी इंग"जांना होती. त्यातूनच गुन्हेगारी जमातीचा कायदा जन्माला आला. हा कायदा जरी 1871 साली अस्तित्वात आला असला तरी त्याच्या प्रसव वेदना 1857 च्या स्वातंत्र्य समरापासून सुरू झाल्या होत्या. 1871 चा जन्मजात गुन्हेगार जमातीचा कायदा पुढे 1950 पर्यंत चालू राहिला. आणि शौर्याच्या राष्ट्राभिमानाचा वारसा जपणारे योद्धे गुन्हेगार झाले.
      स्वातंत्र्यानंतर हा कायदा बदलला गेला तरी समाजमनावर इंग"जांनी लादलेली गुन्हेगारी जमातीची छाप आजही कायम आहे. ज्या भूभागातून हा स्वातंत्र्यलढा या भिल्लवीरांनी लढवला तो भूभाग आजही उपेक्षित आहे. विकासाची गंगा अजूनही तेथपर्यंत पोहोचली नाही. या स्वातंत्र्ययोद्ध्यांप्रमाणे सातपुडाही उपेक्षित राहिला आहे. नाही चिरा, नाही पणती... याच शब्दात त्यांचे वर्णन करावे लागेल.(भिल्ल क्रांतिकारी,भिल्ल उठाव ).

संदर्भ :रवींद्र गोळे, " उपेक्षित पर्व - प्रभाकर मांडे * लोक आणि संस्कृती - गिरीश प्रभुणे *

 1957 चे स्वातंत्र्य समर, दक्षिण भारताचे योगदान - इतिहास संकलन समिती * भटके-

विमुक्त एक चिंतन -

दादा इदाते
हे हि वाचा ;

 भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -१ .

 महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल आणि संस्कृती .

                    मुघलांविरुद्ध मेवाडचे भिल्ल धनुर्धारी  Against the Mughals Bhil archers of Mewar.

 


Post a Comment

0 Comments