क्रांतिवीर तंट्या भिल.
महानायक तंट्या भिलाचे प्राथमिक जीवन ;
महानायक तंट्या भिलाचा जन्म मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेडे गावात १९४२ साली झाला .तंट्या भिलाच्या कुटुंबात भाऊसिंघ त्याचे वडील एक शेतकरी होते .भिल्ल स्वरक्षणासाठी धनुष्य व भालाफेक कलेत निपुण असत साहजिकच तंट्या हि या कलेत तरबेज निघाला .तंट्या भिल्ल एक शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.
तंट्या भिल हा साधा भोळा आणि सामन्य माणूस होता .तंट्या भिलाची जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली होती कर्ज न फेडू शकणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकले गेले .तुरुंगातून आल्यावर तंट्या मोल मजुरी करू लागला परंतु पुन्हा पाटलाच्या मुलीच्या प्रेम संबधाच्या आरोपाखाली त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले .शांत जीवन जगण्याच्या धडपडीत असणार्या तंत्याला जमीन हडपणारे पाटील ,मालगुजार त्यांना साथ देणारे सावकार आणि पोलीस यामुळे त्याचे जीवन जगणे असह्य झाले .अन्याने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला आणि त्याने त्या व्येवस्थेशी झुंज देण्याचे ठरविले .
bhartiyadiwasi blogspot.com |
तंट्या भिलाच्या लढ्याला सुरवात ;-
तंट्या भिलाचा क्रांतिकारी स्वतंत्रयाच्या लढ्यातील महानायकाच्या रुपात उदय झाला .त्याने बलाढ्य इंग्रज सरकारच्या विरोधात लढायचे ठरविले .त्याचा संघर्ष सुरु झाला .तंट्या सावकार ,मालगुजार यांना लुटू लागला .
पोलीस चौकीवर हल्ले चढवू लागला .सावकारांना ,मालगुजार लुटून गरिबांना वाटू लागला.दुष्काळात मालगुजार ,सावकार यांची गोदामे लुटून गरीबात वाटू लागला .बिन व्याजी कर्ज देऊ लागला .स्त्रियांचे रक्षण करू लागला .
bhartiyadiwasi.blogspot.com |
गरीबाचा कैवारी म्हणून लोक तंत्याकडे पाहू लागले.
एक क्रांतिकारी भिल्ल महानायकाचा उदय ;
तंट्या भिल गरीबाचा वाली ,रक्षणकर्ता ,स्त्रियांचा पाठीराखा ,जंगलाचा राजा असा नावलौकिक जनसामान्यांच्या मनात पसरला .तंट्या भिल ह्यात असतनाच त्याचा पराक्रम खानदेश -नर्मदा खोर्याच्या घराघरात पसरला .लोक त्याच्या पराक्रमची गीते आणि कथा एकमेकांना सांगू लागले .त्याच्या समकालीन इतिहासात पुण्यात महत्मा ज्योतीराव फुले समाज सुधारण्याचे काम करीत होते .ब्रिटीश सत्तेने होळकर ,निजाम ,शिंदे यांना आपल्या बरोबर हात मिळवणी करण्यास भाग पाडले.आजही अनेक आदिवासींच्या घरात तंट्या भिल्लाची पूजा केली जाते, असे म्हटले जाते की, तंट्या भिलाला सर्व प्राण्यांची भाषा माहित होती, तंट्या भिलाला आदिवासी देवता मानत होते, आदिवासी लोक अजूनही म्हणतात की, तंट्या भिल्ल त्याच्याकडे अलौकिक शक्ती होती, या शक्तींच्या मदतीने, तंट्या भिल्ल एकाच वेळी १७०० गावांमध्ये ग्रामसभा घेत असत, या शक्तींमुळे २००० ब्रिटिश सैनिकांनीही कोणीही तंट्या भिल्लाला पकडू शकले नाही. तंट्या भिल्ल ब्रिटिशांच्या नजरेतून नाहीसे व्हायचे.असे म्हटले जाते की, तंट्या भिल्ल ग्रामसभेतच लाखो आदिवासीचा वाद सोडवत असत.
तंट्या भिल्ल ब्रिटिशांच्या दडपशाहीचा नाश करण्याच्या जिद्दीचे आणि संघर्षाचे उदाहरण आहे. साल १८५७ नंतर तंट्या भिलाच्या शौर्याची प्रतिमा उदयास आली. जननायक तंट्याने ग्रामीण आदिवासींचे ब्रिटिश सरकारकडून होणारे शोषण आणि त्यांच्या मूलभूत हक्कांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराला विरोध केला. मनोरंजक पैलू म्हणजे स्वतः दडपलेल्या ब्रिटिशांच्या सामर्थ्याने जन्नयक तंत्याला "भारतीय रॉबिनहुड" ही पदवी दिली. त्याला त्याच्याच बहिणीच्या पतीने पकडवून दिले आणि १८८९ साली मध्यप्रदेशातील जननायक तंट्या भिलाला फाशी देण्यात आली. तंटिया भिल्ल एक महान भिल्ल योद्धा होता.
माहिती स्रोत ;गुगल
bhartiyadiwsi.blogspot.com |
माहिती स्रोत ;गुगल
शहीद वीर नारायण सिंह
राणा पूंजा भील .
0 Comments