राष्ट्रपिता महात्मा गांधी (१९२० -१९४७).

Header Ads Widget

राष्ट्रपिता महात्मा गांधी (१९२० -१९४७).

 गांधी युग(१९२०-१९४७)

*१९१७ ते १९१८ या काळात गांधीजीनी केलेले सत्याग्रह ;

१ .चंपारण्य  सत्याग्रह  
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/11/mahtma-gandhi-yug.html

  • *चम्पारण भागात शेतकऱ्यावर  नीळ उत्पादक  सक्ती होती व ती कमी किमतीत   नीळ   विकत घेत .
  • *१९१६   मध्ये   लखनौ   अधिवेशनात  राजकुमार   शुक्ला या   नीळ   पिकवणार्य   स्थानिक  शेतकर्याने   गांधीजींना   शेतकऱ्यांच्या   होणार्या  लुटी बद्दल   सांगितले .
  • *१९१७  मध्ये गांधीजीनी  चम्पारण   येथील  शेतकर्यांना  एकत्र  करून  संघटीत  सत्याग्रह  केला  परिणामी  ब्रिटीश  शासनाने  शेतकऱ्या वरील  अन्याय  दूर केला . 

२.खेडा   सत्याग्रह

  • गुजरातमधील   खेडा जिल्ह्यात   प्लेगची   साथ   व   दुष्काळामुळे शेतकर्यांना शेतसारा भरणे अशक्य होते  त्यांनी सरामाफिची मागणी सरकारने धुडकावून लावली .
  • १९१८ मध्ये मोह्न्लाला पंड्या या स्थानिक शेतकर्याच्या पुढाकाराने महात्मा गांधीनि सारा बंधी चळवळ सुरु केली व सरकारकडून सारा माफ करून घेतला .

३.अहमदाबादचा   कामगार   लढा .

  • अहमदाबाद  येथील   कापड  गिरणीतील   कामगाराची   वेतनवाढ   मागितली   होती.गिर्णो मालकांनी  या   वेतनवाढीला   नकार   दिला  .
  • गांधीजी   च्या   सल्ल्याने   संप   व उपोषण केले परिणामी कामगाराचे ३५ टक्के वेतन वाढले .
रौलट कायदा (१९१९)
  • न्या.रौलट अध्यक्ष  असलेलेया  समितीच्या   शिफारसीवर   असलेले  कायदे   .
  • या  कायद्यानुसार  कोणत्याही  भारतीय   व्यक्तीस विना   चौकशी   तुरुंगात   टाकणे   आणि   सरकार विरोधी  विरोधी   साहित्य   छापणे   व   जवळ   बाळगणे   हा राजद्रोह  ठरवण्यात  आला .
  • रौलट कायदा   हा  काळा   कायदा  ह्या  नावाने   ओळखला   जाऊ    लागला   .
  • रौलट कायद्या विरोधात  देशव्यापी  हरताळ दिन -६ एप्रिल  १९१९ .
  • पंजाब मधील  अमृतसर   येथील   हरताळ  प्रकरणी   हद्दपार केलेले   नेते -डॉ.सत्यपाल,डॉ .सैफुदीन कीचलु .

हे  हि  वाचा ,





Post a Comment

0 Comments