भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -१ .

Header Ads Widget

भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -१ .

भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ).

             आदिवासी समुहाचे अभ्यासक श्री .गोविंद गारे भिल्ल समाजाबद्दल लिहताना माहिती देतात कि ''सातपुडा पर्वत '' हा भाग प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो .सातपुडा पर्वत रंगामधील तापी व नर्मदा नद्यांच्या मधील पहाडी प्रदेश व आजूबाजूला स्थित पर्वतमय प्रदेश ''भिलवाड'' नावाने'नावाने ओळखला जातो .सातपुडयापासून  ''विंध्य ,आरवलीच्या पर्वत रंगापर्यंत ''भिलवाड'' पसरलेला होता .एक पारंपारिक श्रद्धा ,प्रभू रामचंद्र जेव्हा जंगलात आले तेव्हा त्यांना शबरी नावची भिल्लीण भेटली असे रामायणात नमूद करण्यात आले .सर्वाना माहित आहे कि त्या प्रदेशात राहणाऱ्या ',शबर ,किरात,निषाद या नावने ओळखले जाते .महादेवने प्रीयाराधन अशा विलक्षण स्त्री पासून यांची वंशावळ सुरु झाली अशी आख्यायिका आहे .प्राचीन शिलालेख आणि साहित्यात याचा उल्लेख सापडतो .गडद तपकिरी वर्ण ,गोलगरगरीत चेहरा ,रुंद व भलामोठा जबडा  आणि सुद्रुड  शरीर हे प्रमुख लक्षण होय . भिल्ल जमातीत काही पोट वर्ग आढळतात .टेड भिल्ल ,नायदे भिल्ल ,बोडे गावड भिल्ल ,राठवा भिल्ल तडवी भिल्ल ,गारसिया ,ढोली भिल्ल ,डून्गरी भिल्ल ,बरडा भिल्ल ,मेवासी भिल्ल ,रावळ भिल्ल ,धानका भिल्ल इ आदिचा समावेश होतो .

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/bhill_01226241154.html
credit;google 

(भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ).)

          धुळे जिल्ह्यात अनेक जमातीचा समावेश आहे त्यात बरडे भिल्ल,मावची ,वसावे ,पावरा,पाडवी,धानका,लढ्या भिल्ल ,मथवाडी भिल्ल ,बोंडे गवाल भिल्ल ,कोटले भिल्ल ,टेड(धेड ) भिल्ल ,नाईक भिल्ल ,गावित ,मेवाशी भिल्ल आदींचा समावेश होतो .परंपरेने हे निष्णात तिरंदाज भिल्ल आहेत .

       बहुतांशी भिल्ल कष्टकरी आणि मजूर आहेत .काही जंगली माल गोळा करून त्याची विक्री करून उपजीविका करतात .ते मासे पकडण्यात प्रवीण असतात .शिकार करण्यासठी तीर कामठा किवा जाळी वापरतात .तर काही सापळ्याचा वापर करतात .काही कंदमुळे जमविण्यासाठी हि प्रयत्न करतात .भिल्लाच्या जेवणात भाजी भाकरी भात ,ज्वारीची भाकरी ,वरणहि असते .भिल्ल पुरुषाच्या कमरेला घुडग्या पर्यंत आखूड नेसू गुंडलेले असते .अंगात कुडता डोक्याला पागोटे असते.स्त्रिया कमरेभोवती जुनेर गुंडाळतात ,अंगात चोळी घालतात डोक्याला मुंडासे बांधतात .पुरुष व स्त्रिया दोघेही कानात चांदीच्या बाळ्या व बोटात चांदीची वेडनी घालतात .स्त्रिया दंडावर बुलीय ,कंगना माला ,नथनी व इतर प्रकारची दागिने घालतात .

        आदिवासीच्या चालीनुसार बहुपत्नी व प्रौढ विवाह करण्याचा रिवाज आहे .त्यांना विधवा विवाह हि समंत आहे .विवाहच्या वेळी नृत्य गायनाचाही आनद उत्सव होतो .मध्यांची रेलचेल असते .सातपुड्याच्या विवाहची परंपरा मनोरंजक आहे .नवरा मुलगा नवरीला यात्रेत किवा बाजारात पाहतो .लग्नाची मागणी घालतो ,मनाप्रमाणे लग्न नाही जमले तर तिच्या संमतीने तिला पळवून नेतो.मुलीकडून हुंडा घेतला जात नाही उलट मुलाकडून मुलीला दहेज दिले जाते .हि रक्कम पाचशे पासून दोन हजार पर्यंत असू शकते .लग्न फक्त शनिवारी आणि अमवस्या च्या दिवसी लावले जात नाही .लग्न भगत लावतो .लग्न नंतर मांडवात नऊ फेऱ्या मारल्या जातात .लग्नात सर्वाना जेवण व्दारू दिली जाते .

          भिल्ल लोकांच्या रीतीप्रमाणे जर पाच महिन्यानंतर गर्भपात केला तर तो गुन्हा मानला जातो .''वाघदेव ''धानदेव ,''सर्प देव '' डोंगर देव हे भिल्लांचे  देव आहेत व त्याची  ते पूजा करतात .सातपुड्यातील भिल्लाचा देव ''वाघदेव 'रिम देव ,नंदुरा देव  'पलुडा देव .' बडा देव ''याहामोगी इ देव देवता आहेत .शिवाय प्रत्येक गावाच्या सीमेवर हिवारीया देव असतो .तर गावात ''बनिजाह ,हा देव असतो .पावसळ्यात वाघ देवाचा सण साजरा केला जातो .देवाला कोंबडी कापली जाते व भाजी भाकरी निवद धाखवला जातो .त्यानंतर  भिल्ल रानातील पाल्या भाज्या खाण्यास सुरवात करतात .रिम देवाचा सन शिवरात्रीला साजरा केला जातो .

(मराठी विश्वकोश भिल्लाबाद्द्ल्ची माहिती ,लेखक -म .बा ,मांडके )

आदिवासी भिल्ल जमातीची वस्ती मुख्य्तो  कर्नाटक ,गुजरात ,मध्यप्रदेश ,आंध्रप्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र व त्रिपुरा राज्यात आढळते .अरावली ,विंद्या व सातपुडा पर्वतावरील दात वन्य पठारे हे त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होय .वैदिक वांड;मयात भिल्लांचा उल्लेख निषाद म्हणून केल्याचे विद्वान मानतात.त्याचा उल्लेख पौराणिक वाड;मयात हि आढळतो . ''भिल्ल 'हा विल्सन यांच्या मतानुसार द्राविडी भाषा समुहातील ''विल्लू',व' बिल्लू ''(धनुष्यबाण शब्दापासून आलेला आहे.१९७१ च्या शिगान्तीनुसार भिल्लांची लोकसंख्या ५१,९९,०६८ इतकी होती .त्याची भाषा भिल्ली असून तिच्या अनेक बोलीभाषा आहे .त्यात आहेरांनी ,पावरी इ परदेशी भाषा असून त्यात शब्दाची सरमिसळ झालेली आहे .भिल्ल गरासिया ,ढोली भिल्ल ,डुंगरिया भिल्ल ,नेवासी भिल्ल ,तडवी भिल्ल ,रावल भिल्ल ,भिलाला ,भिल्ल मीना इ .ई भिल्ल जमातीच्या पोट जमाती आहेत.भिल्ल प्रोटा-ऑस्ट्रोलोइड  वंशातील असून काळसर वर्ण ,लांबट डोके ,चपटे नाक ,गोल उभट चेहरा  व मध्यम चेहरा व मध्यम उंची हि त्याची शारीरिक वैशिष्ट्य होत .

त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे .त्याच बरोबर गुरे पाळणे ,शिकार अन्न गोळा करणे ,मासेमारी व शिकार हे पूरक व्यवसाय आहे.मका, ज्वारी ,भात बार्ली व कडधान्य हि मुख्य पिके होत .बहुतांशी भिल्ल ,गाई ,बैल ,कोंबड्या ,शेळ्या ,बकर्या पाळतात .त्यांच्यासाठी राखीव कुरण हि असते .मासेमारी व कंदमुळे ,पाने फुले ,मोहाची फुले गोळा करणे हे मुख्यतव स्त्रिया व मुले करतात .रानडुकरे व चिता यांची शिकार ते धनुष्यबाण व सापळा ह्यांच्या साह्याने करतात .त्यांच्या आहारात सकाळी भात व कोद्री असून सायंकाळी भाकरी व कडधान्य असतात .अंडी ,कोंबडी व मासे ,मांस ह्याचाही समावेश आहारात असतो .गोमांस ते निषिद्ध मानतात .महाची दारू व ताडी हे अत्यंत आवडीची पेय आहे आहेत .व त्याचे सेवन स्त्री व परुष दोघेही करतात .टेकडीच्या ठिकाणी पाणी असलेल्या ठिकाणी ते वस्ती करतात .त्यांचे घरे गटागटाने विखुरलेले आढळतात .माती ,शेन ,दगड ,झाडाची पाने ,बांबू व वाळलेले पाने याच्या साह्याने ते घरे बांधतात .

भिल्ल जमातीत दोन बहिविर्वाही अर्धके असतात .एका अर्धकातील लोक एकमेकाशी सपिंड म्हणजे एकरेखीय पद्धतीने जखडलेले असतात .प्रत्येक अर्धकातील अनेक  बहुर्विवाहिक पितृसत्ताक कुली असते .कुळाची नावे गावावरून किवा गणचिन्हवरून घेतलेली असते .प्रत्येक कुळ  हे अनेक वंशावळी पासून झालेले असते .समाजात प्रत्येक व्यक्ती कुळ व अर्धक याचा जन्मसिद्ध सभासद असतोच .भिल्ल कुटुंबाला ''वसुली'' असे म्हणतात .त्यांच्यात पितृसत्ताक पण विभक्त कुटुंब पद्धती आहे .विवाह नंतर मुलगा पितृ गृही राहतो .वयोवृद्ध व्यक्तीच्या हाती कुटंबाची सर्व सत्ता  असते .

क्रमश ;

माहिती स्रोत ;गुगल .

भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -२ 

मानगढ येथील भिल्ल समुद्याच्या आंदोलनात १५००  भिल्ल आदिवासींचे बलिदान .



  


Post a Comment

1 Comments