भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -२.

Header Ads Widget

भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -२.

 भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ)

            पाचव्या महिन्या पासून जीव धरण होतो म्हणून भिल्ल संस्कृतीत गर्भपात निषिद्ध मानतात . गर्भवतीच्या सहा महिन्या पासून ते मुल तीन महिन्यापासून होईपर्यंत पती पत्नीचे लैंगिक संबंध होत नसतात .प्रसूतीचे काम सुईन करते .प्रसूती नंतर चार किवा पाच दिवस जननाशौच पाळतात .पाचव्या दिवशी नामकरण होते .पारंपारिक विवाह पद्धतीत वधुमुल्य देतात .या विवाह पद्धती व्यतिरिक्त खालील पद्धतीने जोडीदार निवडतात ;सेवा विवाह ,आदल बदल विवाह ,घुसखोरी विवाह इ .मध्यप्रदेशातील भिल्लामध्ये वयब ,नत्र ,उद्ल किवा आईवरइ ,घरजमाई,भगोरिया ,घीज्जीलय  व झगडा असे सहा विवाह प्रकार प्रचलित आहे .तसेच विधवा/विधुर यांच्या विवाह्त धाकटा दीर व मेहुणी यांचा विवाह मान्य असला ,तरी तो बंधनकारक नाही .संतीती साठी बहुपत्नीत्व आढळते ;पण सर्वच पुरुष सर्वसाधारणत मेहुनिशी किवा तिच्या नात्यातील स्त्री शी विवाह करतो .(भिल्ल प्राचीनकाळ).

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/bhill_0499756042.html
credit ;google 

            सपिंड विवाह पद्धतीचा गणगोत पद्धतीवर परिणाम झालेलेला दिसतो .उदा .आईचा भाऊ ,आत्याचे यजमान व सासरे यांना ''मामा ' म्हणून संबोधले जाते .धाकटा दीर व मोठी भाऊजई,पती पत्नीच्या सर्व धाकट्या बहिणीशी सलगी संबंध असतो ;मात्र थोरला दीर व ध्क्ती भाऊजई ,सासू सासरे व जावई सून यांच्यात वर्जन संबंध असतो .(भिल्ल प्राचीनकाळ ).


            गावच्या प्रमुखाला ''वासवो''म्हणतात .हे पद वंश परंपरेने मिळते .सामाजिक व्यवस्थेचे नियमन करणे ,देव देवताची पूजन करणे हि वसावो ची कामे आहेत .'पुजारो ,(पुजारी ) पूजा करण्याची व  दवा देण्याचे काम देखील तोच करतो .सार्वजनिक आपत्ती तसेच आजाराच्या काळात ''भगत ,ला विचारून कारवाही करतात .गावाती पंचायतीती वरिष्ठ व वयस्कर प्रतिष्टीत मंडळी असतात .गावातील तंटे सोडविणे हे पंचायतीचे मुख्य काम असून प्रधान व कोतवाल वासोवो च्या आदेशाचे पालन करतात .(भिल्ल प्राचीनकाळ )

भिल्ल जाडप्राण वादीआहेत. भूत खेतावर त्यांव्हा विश्वास आहे ,भूत खेताना मातीची भांडी ,मडकी ,घोडे इ अर्पण करतात .त्यांना कोंबडी,बकरी बळी देतात .त्यांच्यात पूर्वज पूजा रूढ आहे .हिंदूमधील दिवाळी दसरा हे सन आणि महादेव ,कालिका ,इंद्रराज  इत्यार्दी देवना भजतात .याशिवाय महाराष्ट्र व गुजरातमध्ये ,डुंगर्या देव ,शिवर्या देव इ.ढोल ,पावरी व झांज यांच्या तालावर स्त्री -पुरुष नृत्य करतात .

मृताचे दहन करतात .मृत बालकास पुरतात .पती व पत्नी या पैकी एकाचा मृत्यू झाल्यास हयात व्यक्तीला थोडा वेळ मृत व्यक्तीच्या शेजारी झोपावे लागते .मृत व्यक्तीस गरम पाण्याने अंघोळ घालून मुखात नाणे घालतात .१२ व्या दिवशी मित्रांना व आप्तांना जेवण देतात .अश्या प्रकारे १४ दिवस पाळतात .बुरुडाकडून शिडी बनउन घेतात .या शिडीच्या मार्फत मृत आत्मा स्वर्गास जातो .अशी समजूत आहे .

(भिल्ल प्राची काळ (संदर्भ )-२)

दिलेली माहिती हि प्राचीन काळाविषयी आहे वाच कानी समब्रह्म करून घेऊ नये .

माहित स्रोत ;गुगल .

भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -१

मुघलांविरुद्ध मेवाडचे भिल्ल धनुर्धारी  Against the Mughals Bhil archers of Mewar.




Post a Comment

0 Comments