खानदेशातील भिल्ल . खानदेशातील मुख्य जमत भिल्ल व कोळी हेच आहे .बाकीच्यांनी नंतर येऊन वस्ती केली .खानदेशातील भिल्ल म्हणजे खानदेशातील इतिहासाची ओळख होय .खानदेशातील भिल्लांची भारताच्या स्वतंत्र संग्रामात महत्वाची नाही तर तर अति महत्वाची भूमिका दिसून येते व तसे इतिहासात नमूद पण आहे .टोल्मिच्या लिखाणात भिल्ल व गोंड यांचा संदर्भ दिसून येतो .आजही चाळीसगाव भागात गोंड काही प्रमाणात तर भिल्ल मुख्य प्रमाणात दिसून येतात .यादव कालीन राजाच्या यादीत भिल्लम हे नाव पाचदा आले .(खानदेशातील भिल्ल )खानदेशातील वंजारी समाज हा निमाड प्रांत आणि मालवा येथून गाय व बैल यांची उत्कृष्ट जमात आणून व्यापार करतात .हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे .
bhartiyadiwasi.blogspot.com |
अकराव्या शतकात काही गुजरात मधील काही गुर्जर आणि कुणबी खानदेशात स्थलांतर झाले .त्यानंतर १४ व्या शतकात अरबी राजे खानदेशात आले जे परकीय(परदेशी ) होते .भिल्ल व कोळी सोडता सर्व पांगले गेले .१६ व्या शतकात अकबरने भिल्लांना ,गोंड आणि कुणब्यांना अधिकारी जागा दिल्या .१८०३ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा भिल्ल व गोंडाना बराच फटका बसल्याचे दिसुन येते .तो पर्यंत मात्र बरीच सरमिसळ झालेली दिसून येते .वंजारी जमत हे प्रवासासाठी बंद बैलगाडी वापरात असत हि बैलगाडी सजवलेली व विशेष असे .वंजारी व अहेरी ह्या खानदेशच्या मुख्य जमती होत.
अक्राणी तालुक्यातील जंगलाचा आणि भौगोलिकदृष्ट्या प्रीस्ठीचा विचार केला तर सैद्वा पास हा महत्वाचा पास आहे ,जो पन्नास किमी अंतरावर आहे .तोर्न्मालच्या रंगामध्ये दोन भाग पडतात एक उत्तर तर दुसरा दक्षिणे कडे पसरलेला आहे आणि ती अनियमित पठार सात किमी लांब आणि पंधरा ते तीस किमी रुंदीला असेल ,जो अक्राणी परगणा म्हंटला जायचा ,आता तो अक्राणी तालुका आहे ,जो उत्तरेकडे आणि पूर्वेकडे बारवानी स्टेट आणि तोरणमाळ आणि दक्षिणे कडे सुलतानपूर आणि कुकुर्मुंडा शिवाय मेहवास आणि भूदावल आणि नाल आणि पश्चिमेला काठी संस्थाने होती .डोंगर पायथ्याशी खेडे महू आणि जंगली आंबा यांच्या दात झाडात लपलेली आहे.यांच्यात सर्वात वैशिष्ट्य पूर्ण तोरणमाळ आहे .पूर्वेकडून अकरानीची रंग दिसते .उत्तर पश्चिम भागात कोमल आणि उदाड आहे दोन्ही दुर्गम व खडतर आहे .च्डणे शक्य नाही .दक्षिण पश्चिम भागात पसरट टेकड्या व अस्तम्भा शिखरे आहेत .काकरडा जवळील टेकडी ओल्वाल तर भूलाल आणि भोद्लाल हि शिखरे तोरणमाळ जवळची वैशिष्ट्य पूर्ण शिखरे आहेत .या डोंगराच्या खुशीत तांबे ,चांदी आणि लोखंड लपलेले आहे असे म्हंटले जाते .अक्राणी तालुक्यातील लोक कष्टाळू आहेत .वारली आणि पावरी या पैकी पावरी राजपूत वंशातील जे इतर वारली भिल्लापासून वेगळे आहेत .पशुपालक आहेत .आदिवासी जमात आणि त्यांची जंगल यांचा फार जवळचा सबंध असतो .पावरी लोक उंच सखल भागात चंगली शेती करू शकतात .
मौखिक परंपरेने या प्रदेशाचे नाव ''डाब'' दाब असे आहे .तत्कलीन हिडींबा जंगल म्हणजे तळोदा परिसरातील अक्कलकुवा मेवासी संस्थान होत .हल्दीघाटीच्यायुद्धा नंतर राणा प्रताप यांची बहिण इकडे निवासाला आली होती म्हणून अक्राणी महल म्हंटले जाते .मोतिया भिल्ल याचे राज्य असल्याचे मौखिक परंपरा सांगितली जाते .माथा भिल्ल या नावाने ओळखले जाते .तसेच त्याचा कपटाने आनंददेव भिल्ल याने त्याचा वध केला व त्याचे धड जिथे पुरले त्यास धडगाव परिसर म्हणून ओळखले जाते .ई.स .१८१८ पर्यंत हा परगणा धडगाव परगणा मतावरचा राणा भाऊसिंग याने पेन्शन घेऊन ब्रिटीश सरकारने खालसा केले .अक्राणी आणि धडगाव अशी संस्थाने होती .इतर संस्थानात काठी,गण्ठा ,सागबारा ,रायसिंगपूर ,सिंगनूर ,नाला ,भंगारपाणी ,अमोदा ,हरिपूर ,सजनान हि होती तर,मेवासी ,लारीया ,सागबारा हे तळोदा परिसरातील होते .
सातपुड्यातील भिल्लांची संस्थांनाची नावे कुळनावावरून होती .पाडवी-बुधावल (काढी)नाला,सिंगनूर सजठाण ,भगदरी ,वसावे -गनढा,सागबारा ,वळवी -रायसिंगपूर ,नाईक -भाग्रापाणी ,आमदा मोर अंबा हि होय .तेथील संस्थानिक स्वतःला चीपटन राजे म्हणत .स्वत्न्र्य संग्रामात आदिवासींनी बरेच उठाव केल्याचे दिसून येते .१८०० ते १८८५ या काळात केलेल्या उठ्वाची माहिती पहिली तर काजल राणी आणि हिऱ्या नाईक १८२२ मध्ये ,१८२५ मध्ये शिवराम लोहार ,१८४० मध्ये डांग चे राजे प्रतापसिंग ,१८२८-१८८९ तंट्या भिल ,१८४१ कुवर्सिंग वसावा ,उमाजी नाईक कजेसिंग १८५७ ,देवजी राउत १८५७ इ आपले बलिदान दिले .भागोजी नाईक आणि भीम नाईक हे तर वेगळेच .
प्रत्येक आक्रमण करी आपली सीमा वाढवण्याच्या नादात तिथ पर्यंत पोहचला होता .पण त्यामुळे सामन्याच्या कष्टाच्या जीवनात काही फरक पडला नाही .
खानदेशातील सर्वात जास्त संख्या असलेला म्हणजे वर्ग म्हणजे भिल्ल होय .१८८० मधील खानदेश गझेटर मधील लोकसंख्या पुढीलप्रमाणे -१,२६,७९१ -भिल्ल ,३६,५७२ -वंजारी ,४५०५-पारधी ,८२०१ -कोकणी ,८१८ -कानडा ,हि होते तर १९७२ मध्ये १,२००२६ एवढी होती .मेवाड ,माळवा ,खानदेश आणि गुजरात या भागात विखुरलेले होते अशी नोंद आहे .मध्य भारत सोडून राजपुताना ,गुजरात आणि खानदेश ,भिल्ल हे अजमेर ,जैसलमेर भागात आहे तर उत्तर पश्चिम भागात बरेकली भांडा भागात आहे .ख्न्देश भिल्ल असल्यामुळे ते आशीरगढ सोडून बुलढाण्यातील गोंड प्रदेशाकडे जात नाही .नगर जिल्ह्यातील काही भाग तसेच कुडकी नदीचे खोरे जुन्नर भागातही भिल्ल आहेत.कोकण आणि तापीच्या काठावर वसलेले कोळी भिल्ल आहेत .तापीच्या उत्तरे कडील गुजरात आणि डोंगराळ भागत कोळी भिल्ल आहे .जे परिस्थिती मुले माळवा भागात स्थलांतर करून राहिले.पुढे काठेवाड आणि कच्च भागातही पसरले .थर आणि पारकर भागात तर कमी प्रमाणात सिंध मध्ये आहे .सादर उल्लेख खानदेश गझेटर मध्ये आहे .खानदेश येथील आधीच्या नोंदीनुसार सातपुड्यात असलेले भिल्ल मेवाड आणि मेवाडच्या दक्षिणेकडे स्थलांतर करण्यास राजपूत व मुस्लीम शासकाने भाग पडले .त्यांनी गुजरात आणि माळवा जिंकला होता म्हणून मग खानदेश भर ते तुरळकच पण सगळीकडे पसरलेले आहेत .जे गावात राहिले मजुरी करून जगू लागले त्यात मुलनिवासींचा फरक पडला .काही राजपूत राजकरत्या बरोबर तर काही मुस्लीम राजकर्त्या बरोबर वसले त्यामुळे त्यांचे मुळचे जीवन संपून गेले .सोळव्या शतकात मोगल बादशाच्या मते ते कष्टाळू आणि प्रामाणिक होते म्हणून काहीना सैन्यात तर काहीना जमिनी दिल्या गेल्या .अठराव्या शतकात मराठ्या कडे सत्ता गेली आणि परत गोंधळ उडाला आणि त्यांनी स्वतःला स्वत्न्र्य मानायला सुरवात केली .कुणबी आणि भिल्ल यांच्यात स्थानिक वसलेले शेतकरी आणि भिल्ल चोर लुटारू अशी विभागणी झाली .हा गोंधळ चलूच राहिला .त्यामुळे सपाटीवर राहून शेतमजूर,जंगल निवासी पण लाकूड फाटा चोरी आणि लूटमार करणारे मिश्र तर संपूर्ण जंगल निवासी अशी विभागणी झाली .जंगलात राहणारे बारडा ,धानका,धोरेपीस ,गावित ,खोतीस ,माथ्वादिस ,मावची,नाहाल,वारली सह्याद्री आणि डांगची होय तर मिश्रमध्ये भिलाला ,अर्धभिल्ल ,अर्ध राजपूत आणि कुणबी .अर्ध मुस्लीम अर्ध भिल्ल तडवी ,उत्तर भागात सापडतात .तर निर्धी हे पूर्वेकडील बाजूस आहे .तर खेड्यात भिलाटी म्हणून प्रत्येक गवत दिसून येणारे पवार ,माळी, बरडा ,गायकवाड ,शिंदे ,जाधव ,सोनावणे , अश्या बर्याच प्रकारच्या उपजाती दिसून येतात .
माहिती स्रोत ;google .
कोटिया भील,कोटाचा इतिहास जाणून घ्या.
भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -१ .
भिल्ल प्राचीनकाळ (संदर्भ) भाग -२.
भिल्ल क्रांतीकारांचे स्वातंत्र्यसमर .Bhil Revolutionary War of Independence.
क्रांतिवीर तंट्या भिल १८७८ ते १८८९ .
क्रांतिवीर भागोजी नाईक 1857-1859 .
खानदेशातील भिल्लांचा इंग्रजाविरुद्ध लढा .
0 Comments