खानदेशातील भिल्लांचा इंग्रजाविरुद्ध लढा .

Header Ads Widget

खानदेशातील भिल्लांचा इंग्रजाविरुद्ध लढा .

 खानदेशातील भिल्लांचा इंग्रजाविरुद्ध लढा .

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/khandeshbhilluthaw.html
bhartiyadiwasi.blogspot.com

           सदर लेखामध्ये तत्कालीन भिल्ल परिस्थिती चा आढवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १९०३ चा दुष्काळ आणि त्यानंतरच्या मराठा आक्रमणाने भिल्ल शेतीपासून दूर फेकले गेले आणि लुटालूट करू लागले याची सविस्तर चर्चा केली आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी कॅप्टन ब्रिग्ज यांची निवड केली. गुमानी नाईक हा पहिला भिल्ल तयार झाला जो सैंदवा पास येथे होता त्यांच्याकडे २३० भिल्ल होते. पुढे १८२१ मध्ये काही भिल्ल पकडले गेले. जवळजवळ २०० कैद करून ठाणे येथे तुरुंगात ठेवले होते. त्यांना माफी करार देऊन सोडून दिले पण खानदेशात परतल्यावर त्यांनी हत्यासत्र आरंभले, ज्यांनी त्यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना मदत केली होती. परत परिस्थिती जैसे थे झाली. कॅप्टन ब्रिगचे ही संघर्षांची वर्णने लिहून ठेवले आहे. शेतीसाठी जमीन व बैलाच्या साठी कर्ज अशी कल्पना १८२४ मध्ये आर्च राबर्टसन्स या कलेक्टरने लढवली आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/khandeshbhilluthaw.html
bhartiyadiwasi.blogspot.com

यासाठी जेम्स ऑट्रम या तरूण आणि साहसी अधिकारी निवडण्यात आला. भिल्ल कार्पची स्थापना १८१९ मध्ये केली आणि शिपाई भरती सुरू करुन कवायती सुरू झाल्या. सुरवातीच्या काळात हे ड्रील आणि शिस्तबद्ध आयुष्य त्यांना आवडले नाही पण हळूहळू फरक पडला. १८२५ मध्ये धरणगाव येथे मुख्यालय बांधले आणि भिल्ल एक नवीन जीवन सुरू झाले. १८३५ मध्ये ७०० ,१८४२ मध्ये ७६३ अशी संख्या वाढतच गेली. शेवटी ११६० ही झाली. यात डांग भागातील भिल्ल नव्हते. १८२८ मध्ये सात पोस्टवर नियुक्ती करण्यात आली तर पुढे ती वाढवण्यात आली.
पुढे १८४७ मध्ये भिल्ल प्रमुख कुंवर वसावा याने अचानक गठबंधन तोडून अरब लुटारू प्रमुख असलेल्या टोळीबरोबर जाऊन मिळाला. त्यामुळे नाईलाजास्तव मालेगाव येथील बिग्रेड त्याच्या मागावर पाठवण्यात आली.पकडला गेला आणि दहा वर्षे तुरुंगात राहिला. १८५४ मध्ये सुटका झाली.
भिल्ल कॉर्पने राघोजी बंगारिया या लुटारू स पकडण्यात पोलिसांना मदत केली. मोसन लाल यांनी तीस वर्षे सर्विस दिली आणि औट्रम तसेच ग्राहम बरोबर काम केले आणि विश्वासपात्र झाला. शेवटी त्यास गौरविण्यात आले. अशी २७ अधिकारी होते. धरणगाव येथे १८२९ मध्ये भिल्लांसाठी शाळा चालवण्यात आली. दुसरी १८४५ मध्ये मुलांना चाळीस किलोमीटर अंतरावर यावे लागते म्हणून भडगाव येथे ३२ विद्यार्थी असतांना नाईकांच्या विनंतीवरून काढण्यात आली.तळोदा येथे अजून एक शाखा काढली.
ब्रिटीश काळात पोलिस अशी वेगळी पद नव्हती पण भिल्ल कार्प हे फारशी मिलीटरी कामे नसल्याने आपोआप जागल्या जी पारंपरिक पद्धतीने ड्युटी होती ती करत गेले.
भिल्ल आणि शेती विषयक
खानदेशातील १८२६-२७ या काळात ४०१५ एवढ्या खेड्यापैकी ३५७ ही जागीर आणि इनाम होती. त्यापैकी उरलेली ३६५९ ही २७०१ एवढी वहीवाटीत होती तर ९५८ एवढी ओस पडली होती. सरकारने ती ओस पडलेली खेडी व शेती वहीवाटीखाली आणण्यासाठी भिल्लांना प्रोत्साहित केले. ही घटना १८२५ मधील आहे. त्यासाठी कोवल किंवा सनद देण्यात आली. जी वीस वर्ष काळासाठी असेन आणि संपल्यावर नवीन दहा वर्षे वाढवता येईल एका नांगराला वर्षाला पाच रूपये कर भरावा लागेल. बॉम्बे प्रेसिडेन्सीने मान्यता दिली. सुरवातीच्या पाच वर्षांसाठी मोफत देण्यात आली. कृष्ण नाईक,सुभल नाईक, यांनी चाळीसगाव तालुक्यातील तसेच वाघु नाईक ही काही नावे आहेत. पाच वर्षांत बरीच प्रगती केली आणि स्थिर आयुष्य जगायला सुरुवात केली. ही एक प्रकारे मानवीय कृती होती. जरी राज्यकर्ते असले तरी औट्रम आणि इतर अधिकारी यांच्यात एक चांगले नाते वाढीस लागले. आजही चाळीसगाव तालुक्यातील घाट औट्रम घाट म्हणून ओळखला जातो. यातच सारे आले.
१८२५ पर्यत जे शांततेचे परिणाम होत होते ते पुरेसे नव्हते. भिल्ल नायकांना तनख्याची लालूच देऊन काही भागत नव्हते. सैन्य आणि दमदाटीने सुध्दा नाही म्हणून निती बदलली आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.धुळे जिल्ह्याचे तीन विभाग करून प्रत्येक विभागावर भिल्ल एजंटाची नियुक्ती करण्यात आली. या भिल्ल एजंटांना जमिनी देऊन वसविण्यात आले. नायकांना तनखे देऊन त्यांच्यावरच शांततेची जबाबदारी देण्यात आली. कॅप्टन औट्रम याला भिल्ल पलटण उभी करण्यासाठी आदेश दिले होते. तो धाडसी आणि शूर होता त्याने भिल्लांवर विश्वास टाकला. भिल्ल वसतीवर जाऊन निशस्त्र रहायला सुरुवात केली. भिल्लांबरोबर जंगलात, पहाडात हिंडून जंगली जनावरांना तोंड दिले. काही दिवसांनी मालेगाव येथे भिल्ल पलटणीचे काम सुरू केले.या फलटणीच्या सहाय्याने भिल्ल बंडखोरांना शरण आणले. जमिनी देऊन शेती वसवणे,तनखे देऊन जागल्या तसेच रखवालीचे काम देणे, सैदवासारख्या घाटात प्रवाशांना संरक्षण करण्यासाठी जबाबदारी देणे आणि वेळ पडली तर भिल्ल पलटणीच्या सहाय्याने त्यांना शरण आणणे.या मार्गाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीशांनी प्रयत्न केले.
याचा अर्थ ते संतुष्ट होते त्यांना ब्रिटीश सरकार मान्य होते असा नाही तर १८ ५७ मध्ये खदखदणारा असंतोष परत उफाळून आला. संधी मिळताच परत एकदा तीरकामठा आणि ठासणीच्या बंदुका हाती घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देत राहिले. यात फक्त भिल्ल होते असे नाही तर महादेव कोळी, रामोशी, अजिंठा व नगरचे भिल्ल हे सुद्धा होते.
एक महत्त्वाचा फरक होता जो ब्रिटीशांनी भिल्ल जीवन ढवळून निघाले त्याचे कारण म्हणजे मुगल काळापासून ब्रिटीशांचा लाकडी वखारींचा व्यवसाय होता. खानदेशातील साग, सालाची लाकडे जलवाहतूक करून सुरतेच्या बंदरातून निर्यात होत एवढे की लंडनमधील घरातील लाकडी फर्निचर बनत असे या भागात कारागिरही होते. अगदी मुगल इतिहासकार अबुल फजल म्हणतो की, “भारतात कारखान्यांची गरज नाही कारण की इथल्या कारागिरांच्या बोटात जादू आहे”. सावदा तसेच पेशवेकालीन वाड्यातील लाकुडकाम हा उत्कृष्ट नमुना आहे. जो खानदेशात बनत होता आणि हे लाकूड जंगलात पर्यायाने भिल्लांच्या भागात होते. दुसरा महत्त्वाचा फरक हा की आधीच्या काळातील हिंदू किंवा मुसलमान राजे डोंगराच्या आणि टेकड्यांच्या भागात फारशी ढवळाढवळ करत नसत त्यांची युध्दे सखल भागात चालत पण ब्रिटीशांनी समाज व्यवस्थेची घडी विस्कटायला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांनी शेतसारा पैशातच भरला पाहिजे असा नियम केला तर शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा हक्क देऊन त्याने शेतसारा भरलाच पाहिजे या नियमानुसार कार्यवाही केली त्यामुळे पुर्वीचे सामाजिक व आर्थिक संबंध बदलून गेले.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जंगलतोड करून जमीन लागवडीखाली आणली आणि त्यामुळे कंदमुळे फळे खाऊन जगणारा भिल्ल व आदिवासी यांच्या जिवनावर परिणाम झाला. ब्रिटीशांना सावकार वर्गाला साथ दिली आणि त्यांनी अत्याचार करायला मदत झाली मुळे कर्जबाजारी झालेला हा समाज अजून गाळात रूतला.
या सर्वांचा परिणाम भिल्लांचे उठाव होतच राहिले.
१८४७ मध्ये अक्राणी तालुक्यातील आरोळे गावावर भिल्लांनी हल्ला केला. चिखलीच्या कुंवरसिंग वसावाने बंड पुकारले. नंदुरबारच्या भिल्ल एजंटावर कुंवरसिं वसावा नाराज होता. आपल्या कारभारात भिल्ल एजंट ढवळाढवळ करतो हे त्याला मान्य नव्हते. ब्रिटीशांनी त्यास शरण येऊन माफी मागण्यास सांगितले पण त्याने नकार दिला. पुण्याहून घोडेस्वार दल तर मालेगाव येथून भिल्ल पलटणीचे सैनिक मागवून त्यावर हल्ला केला त्याने जोरदार मुकाबला केला. त्याला दहा वर्षे शिक्षा झाली. त्याचा मुलगा रामसिंग व पुतण्या सोनाजी यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवले पण ते तेथून निसटले आणि परत बंडखोरी सुरू केली. १८७८ मध्ये रामसिंग यास पकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि रवानगी देशाबाहेर केली.
१८४५ नंतर पुढची दहा वर्षे भिल्ल शांत राहिले. ब्रिटीशांनी येथील राजांची संस्थाने खालसा करायला सुरुवात केली आणि या देशातील लोकांच्या मनातील राजे राजवाडे, संस्थानिकांच्या बद्दलचा राग उफाळून आला. १८५७ च्या उठावाला सुरूवात झाली. ब्रिटिशांच्या सैन्यात नोकरी करणाऱ्या हिंदी शिपायांना बंड पुकारले. ही आग झपाट्याने पसरली या संधीचा फायदा घेऊन खानदेश, नगर, नाशिक, निमाड, निजामशाही सगळीकडे भिल्ल नायक बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले. काजरसिंग नाईक आणि खाज्या नाईक यांनी प्रथम बंडाला सुरवात केली.
संदर्भ:
• Cambridge University press, imperial solution of a colonial problem: Bhils of Khandesh up to c 1850 authors, Benjamin and B.B. Mohanty 2007 Gokhale institution of politics and economics, Pune.
हे हि वाचा ,
















Post a Comment

0 Comments